देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा – eNavakal
News आघाडीच्या बातम्या देश

देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. खरीप हंगामासाठी १४ पिकांचा हमी भाव वाढविण्यात आला आहे. १४ पिकांचा हमी भाव दीडपटीने वाढवण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला आहे. केंद्रातील मोदी सरकारने २०१६ साली किमान हमी भाव केवळ २५ रुपये वाढविला होता तर २०१७ साली हमी भाव ५० रुपयांनी वाढविला होता. मात्र आता निवडणुका आल्याने हमी भाव एकदम दीडपट वाढविला आहे.

खरीप पिकांच्या हमी भावात २०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे तर आता धान उत्पादकांना १७५० रुपये हमी भाव मिळणार आहे. तसेच रागीच्या आधारभूत किंमतीत ९९७ रुपयांची, मुगाच्या आधारभूत किंमतीत प्रति क्विंटल १४०० रुपये, धानाच्या हमीभावात २०० रुपये प्रति क्विंटल, तुरीच्या आधारभूत किंमतीत प्रति क्विंटल २२५ रुपये, हायब्रीड ज्वारीच्या एमएसपीमध्ये ७३० रुपये, कारल्याच्या आधारभूत किंमतीत १८२७ रुपये, मध्यम, लांब कपाशीच्या एमएसपीमध्ये ११३० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

एमआयएमकडून मुंबईतील ५ उमेदवारांची यादी जाहीर

औरंगाबाद – एमआयएम पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एमआयएम ‘वंचित’ आघाडीत सहभागी होईल अशी चर्चा होती. मात्र...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई – शिवसेना-भाजपा युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच युती न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More
post-image
देश

सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

मुंबई – आज सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २२ पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर...
Read More