देशातील मिलेटरी फार्म बंद करून एक हजारात गाई विकण्याचा संरक्षण मंत्रालयाचा घाट – eNavakal
News मुंबई

देशातील मिलेटरी फार्म बंद करून एक हजारात गाई विकण्याचा संरक्षण मंत्रालयाचा घाट

मुंबई- देशाचे रक्षण करणार्‍या जवानांना दुधाचा पुरवठा करणे सोयीस्कर व्हावे म्हणून इंग्रज काळात उभारण्यात आलेले मिलेटरी फार्म बंद करून त्यातील गाई एक हजारात विकण्याचा संरक्षण मंत्रालयाने धेतलेल्या निर्णया विरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयने आज दखल घेतली.

सामाजीक कार्यकर्तेे सामाजीक कार्यकर्ते दिलीप काटे यांच्यावतीने शेखर अ‍ॅड शेखर कंपनीचे अ‍ॅड शेखर जगताप आणि साईरूचीता चौधरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती भुषण गवई आणि न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने आश्चर्य व्यक्त करून सरंक्षणमंत्रालायाच्या निर्णयाला तसेच गाई विक्रि करण्यास स्थगिती दिली. तसेच दोन आठवड्यात केद्र सरकार, संरक्षण मंत्रालायासह प्रतिवादीना दोन आठवडयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देऊन याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.

सरंक्षण मंत्रालयाच्या या निर्णया विरोधात दाखल करण्यात आलेली ही याचिका अ‍ॅड शेखर जगताप यांनी न्यायमूर्ती भुषण गवई आणि न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाच्या आज निदर्शनास आणून दिली. इंग्रज सरकारने जवानांना दुध पुरवठा सुरळीत करता यावा म्हणून 1889 मध्ये देशात सुमारे 19 हजार एकर जमीनीवर 39 मिलेटरी फार्मची निमिर्ती केली. होती . मिलेट्रीच्या याच फार्म मधून सन 1948, 1965 1971 आदी युध्दकालीन परिस्थितीत जवानांना दुध पुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर
तत्कालीन सरंक्षण मंत्रालयाने 1981- 82 दरम्याने इंडीयन कौन्सील ऑफ रिसर्च यांच्या मदतीने जास्त दुध देणार्‍या नवीन जातीच्या गाई संसोधन सुरू केले. हॉलंड च्या फ्रिसनर्स आणि भारतातील सैजवाल या गाईंच्या संक्रमणातून फ्रिसवाल जातीचे संशोधन सुरू केले हाजारो कोटी रूपये खर्च करून कोणत्याही हवामानात तग घरू शकणार्‍या होलॅन्डच्या फ्रिसनर्स आणि भारतातील सैजवाल या गाईंच्या संक्रमणातून फ्रिसवाल जातीची गाईची निर्माती केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

शक्ती मिल बलात्कार प्रकरण! हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गुन्ह्यात फाशी नाही, तर बलात्कारात का?

मुंबई- एखाद्याची हत्या करणे अथवा शरीराचा एखादा भाग धडापासुन वेगळा करणे अशा अमानवी स्वरूपाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षेची तरतूद नाही . त्या मुळे हत्ये पेक्षा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईत बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प

वसई – बीएसएनएलच्या इंटरनेटचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यामुळे वसईतील दस्त नोंदणी रखडत चालली असून त्याचा फटका मात्र दररोज नोंदणी कार्यालये व त्याच्या लाखो...
Read More
post-image
News मुंबई

पालिकेचा केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ पुरस्काराने सन्मान

मुंबई – पालिकेद्वारे नागरिकांना देण्यात येणार्‍या विविध सेवा सुविधा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, विविध परवानग्या, दाखले, अनुज्ञप्ती पत्रे यासारख्या सेवा सुविधा माहिती...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पालिकेच्या रुग्णालयातील एक्स-रे मशीन कोमात

वसई- वसई-विरार महापालिकेच्या नालासोपार्‍यातील रुग्णालयाची एक्स-रे मशीन महिनाभरापासून नादुरुस्त असून आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे गोरगरीब रुग्णांना हजारो रुपयांचा भुर्दंड हकनाक सोसावा लागत आहे. नालासोपारा पुर्वेकडील...
Read More
post-image
News विदेश

‘जैश’चे मुख्यालय पाकिस्तानने घेतले ताब्यात

इस्लामाबाद – भारताच्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय ताब्यात घेतले आहे. मौलाना मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय बहावलपूरमध्ये आहे. पंजाब सरकारने हे मुख्यालय ताब्यात घेतल्याची...
Read More