देशातील निवडणुका आणि ईव्हीएम मशिन्स – eNavakal
संपादकीय

देशातील निवडणुका आणि ईव्हीएम मशिन्स

राज्यातील जळगाव आणि सांगली नगरपालिकांच्या निवडणूक निकालानंतर आणि महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लोकसभा निवडणुकीबरोबरच घेण्याच्या विनंतीनंतर पुन्हा एकदा ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांविषयी तक्रारी सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेतील ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापकाने भारतातील निवडणुकांसंदर्भात रशिया तंत्रज्ञानाचा वापर करून हस्तक्षेप करू शकते अशा प्रकारचे खळबळजनक विधान केले आहे आणि आता या सर्व परिस्थितीचा विचार केला तर देशपातळीवर तब्बल 17 विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आगामी लोकसभा निवडणुकीत मतपत्रिकांचा वापर करावा अशी मागणी केली आहे. राजकारणात कोणत्या विषयाला केव्हा कसे महत्त्व प्राप्त होईल हे सांगता येत नाही. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच मतदान यंत्रविरोधात इतक्या मोठ्या संख्येने राजकीय पक्ष एकत्र येण्याचा प्रकार घडतो आहे. निवडणूक आयोगाने या ईव्हीएम मशीनबाबत असलेले संशयाचे वातावरण दूर करण्याचा यापूर्वी प्रयत्न केला आहे. परंतु अजूनही राजकीय पक्षांचे समाधान झालेले नाही. देशात होणार्‍या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीलाच यश मिळत असल्याने या ईव्हीएम मशीनविषयी संशय वाढत असल्याचे दिसते. ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच कशी काय विजयी होते, असा या विरोधी पक्षांचा सवाल आहे. याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय या पक्षांना येतो. तो पूर्णपणे दूर करण्याची आवश्यकता आहे. अर्थात ही गोष्टही दुर्लक्षित करता येणार नाही. ही सात महिन्यांपूर्वी देशात झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये विरोधी पक्षांना दणदणीत यश मिळाले होते. अगदी उत्तर प्रदेशमध्येसुध्दा प्रचंड विजय मिऴवणार्‍या भाजपाला या पोटनिवडणुकांमध्ये धूळ चाखावी लागली. त्यावेळी याच विरोधी पक्षांनी याच ईव्हीएम मशीनविरोधात तक्रार केली नव्हती. तरीदेखील जर यासंदर्भात राजकीय पक्षांच्या मनात संशयाचे वातावरण असेल तर ते दूर केले पाहिजे. खरे तर याबाबतची अतिशय विस्तृत चर्चा आणि उपाययोजनांबाबत संसदेत विषय मांडला गेला पाहिजे. कारण वारंवार उपस्थित होणार्‍या या विषयाचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लागणे हिताचे आहे. ज्याप्रमाणे देशात विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र घेण्यासाठी सर्व पक्षीय चर्चा व्हावी असे आवाहन पंतप्रधानांकडून केले जाते. त्या प्रमाणेच या ईव्हीएम मशीनबाबत सर्व पक्षीय चर्चा घडवता येऊ शकते.

मतपत्रिकांचा आग्रह
खरे तर हा विषय तसा खूप जुना आहे. काँग्रेसच्या काळात विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पार्टीने ईव्हीएम मशीनबाबत तक्रारी केल्या होत्या. गुजरातमध्ये तिथल्या निवडणुकांच्यावेळी ईव्हीएम मशीनसोबत व्हिव्हिपॅट नावाचे मशिन जोडण्याचा निर्णय घेतला गेला. अगदी न्यायालयानेसुध्दा यासंदर्भात आदेश दिला होता. परंतु प्रत्यक्ष मतदानानंतर त्याची पडताळणी होत नसल्याने त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. आता अशाच प्रकारची व्यवस्था करून ईलेक्ट्रानिक मशीनमध्ये व्यवस्था करून प्रत्यक्ष कोणाला किती मतदान झाले आहे याची माहिती देणारा कागद उपलब्ध होऊ शकतो. त्यावरून मतांची पडताळणी करता येईल. मात्र याला अजूनही विरोधी पक्ष तयार नाहीत असे दिसते. ज्यांना मतपत्रिकेद्वारेच मतदान हवे आहे. परंतु असा आग्रह धरला जाणे ही गोष्टसुध्दा त्यांच्याविषयी संशय निर्माण करणारी ठरू शकते. जगामध्ये बहुतांश देशात ईलेक्ट्रानिक मतदान यंत्रांचा वापर केला जातो. भारतात आतापर्यंत तीन लोकसभा निवडुकांमध्ये ईव्हीएम मशिन्स वापरली गेली याच मशीनच्या आधाराने काँग्रेसला दोन्ही वेळा विजय मिळाला होता. तीच मशिन्स आतासुध्दा आहेत. परंतु त्यातल्या तंत्राचा वापर करून त्यातला डेटा हॅक केला जातो अशीसुध्दा तक्रार असल्यामुळे त्याचे निवारण झाले पाहिजे. ज्यांना कोणाला डेटा हॅक होतो याची माहिती आहे त्यांनी ते आयोगाच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे. कारण भारतासारख्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीप्रधान देशात मतदानाची कार्यप्रणाली ही सर्वाधिक पारदर्शक असावी लागेल. याविषयी जर लोकांच्या मनात संशय असेल किंवा राजकीय पक्ष संभ्रमात असेल तर ते अतिशय अयोग्य ठरते.

पश्चिम बंगालचे उदाहरण
यातला विचित्र भाग असा आहे की, या विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम आणि सगळ्यांना घेऊन ईव्हीएम मशीनविरोधात तक्रार करण्याचा पुढाकार ममता बॅनर्जी घेत आहेत. सहा महिन्यांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये ग्रामपंचायत निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी मतपेट्यांचा वापर झाला आणि या मतपेट्या पळवण्याचे कितीतरी प्रकार घडले. एवढेच नव्हे तर तलावामध्ये नेऊन या मतपेट्या बुडवल्या जात असल्याची दृष्ये देशाने अनेक टीव्ही चॅनल्सवर पाहिली होती. त्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला भरघोस यश मिळाले हा विरोधाभास लक्षात घेतला तर ईव्हीएम मशीन विरोधामागचा हेतू सहज लक्षात येतो. परंतु ही काही एकाच पक्षाची तक्रार नाही. जवळपास 18 पक्ष एकत्र आले आहेत. त्या सर्वांच्या भूमिकेविषयी संशय घेता येणार नाही. त्यानिमित्ताने विरोधी पक्ष एकत्र येत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे. परंतु ज्याप्रमाणे अविश्वास प्रस्तावाच्यावेळी त्यांच्यातील संघटीतपणा दिसून आला नाही तसा प्रकार ईव्हिएम मशीनविरोधाबाबत होऊ नये. आता त्यांनी ईव्हीएम मशीनबाबत व्यक्त केलेला अविश्वास सिध्द करून दाखवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि सरकारनेसुध्दा संपूर्ण देशाला विश्वासात घेऊन या विषयाबाबतचा संशय दूर केला पाहिजे. एव्हरी व्होट मोदी असे या ईव्हीएमबाबत जे म्हटले जाते ते खरे नाही हे दाखवण्याची जबाबदारी निवडणुक आयोग आणि केंद्र सरकारवर आहे. लोकसभा निवडणुकांना अजून बराच कालावधी असल्याने याबाबतचा संभ्रम नक्कीच दूर करता येऊ शकतो. आजच्या तंत्रज्ञानाचा वापर करून काहीही घडवता येऊ शकते. ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापकाने रशिया भारतातील निवडणुकांना लक्ष्य करू शकते हा गौप्यस्फोट गांभीर्याने घ्यायला हवा. कारण अमेरिकेतील निवडणुकांमध्ये रशियाकडून काही सूत्रे हलवली गेल्याचा फार मोठा आरोप झाला होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

वसतिगृहांच्या तक्रारींवर निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा आरपीआयचा इशारा

क र्जत,- तालुक्यातील विविध शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या गैरसोयीबद्दल आरपीआयच्या शिष्टमंडळाने समाजकल्याण आयुक्त यांची भेट घेऊन तक्रार केली. वसतिगृहांच्या कार्यपद्धतीत आठ दिवसात सुधारणा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे

अमृतसर – रावण दहनापूर्वीचा खळबळजनक व्हिडीओ व्हारल

अमृतसर – अमृतसरमध्ये घडलेल्या ट्रेन अपघातामध्ये ६१ लोकांचा जीव गेला. तर काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यातच एक खळबळ जनक वृत्त समोर येत...
Read More
post-image
महाराष्ट्र

फटाक्याच्या कारखान्याला आग, सुदैवाने जीवितहानी टळली

उस्मानाबाद -उस्त्मानाबादमधील तेरखेडा येथील एका फटाक्याच्या कारखान्यात रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जबरदस्त स्फोट झाला. दरम्यान, घटनेवेळी कारखान्यात कोणीही नसल्याने मोठी जिवितहानी टळली. वाशी तालुक्यातील तेरखेडा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीजवर ८ गडी राखून भारताचा दणदणीत विजय

गुवाहाटी- पाहुण्या वेस्ट इंडिजविरुद्ध आज येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवून 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी...
Read More
post-image
महाराष्ट्र

रेशनचे धान्य कमी मिळाल्याने बुलढाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

खामगाव – रेशनचे धान्य कमी मिळत असल्याने त्रस्त झालेल्या एका लाभार्थ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना खामगाव तालुक्यातील पळशी बु....
Read More