देशाचे नाव उंचाविण्यासाठी विद्यार्थ्यानी स्वतः सर्वगुण संपन्न व्हावे- प्राचार्य किसनराव रत्नपारखी  – eNavakal
महाराष्ट्र शिक्षण

देशाचे नाव उंचाविण्यासाठी विद्यार्थ्यानी स्वतः सर्वगुण संपन्न व्हावे- प्राचार्य किसनराव रत्नपारखी 

कवठे यमाई – आपल्या  देशाचे नाव उंचाविण्यासाठी व पुढे नेण्यासाठी शालेय जीवनातील विद्यार्थ्यानी स्वतः सर्वगुण संपन्न व्हावे. नंतरच  तुम्ही ज्या परिसरातून शिक्षण घेता  त्या शाळा,गाव,राज्य व देशाचे  भवितव्य  उज्वल स्वरूपात बदलू शकेल असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्राचार्य किसनराव रत्नपारखी सर यांनी केले.   ते आज शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील न्यू इंग्लिश स्कुल मध्ये झालेल्या इयत्ता १० वी  व १२ वीच्या  परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्याना आयोजित शुभचिन्तन व निरोप समारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कुल कमिटीचे चेअरमन अर्जुनदादा सांडभोर हे होते.  तर प्रमुख अतिथी म्हणून  सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या  बहिःशाल  विभागातील व्याख्याते  प्रा. प्रशांत खामकर हे होते.
      शिरूर पंचायत समिती सदस्य डॉ सुभाष पोकळे,जुनिअर कॉलेजचे उपाध्यक्ष मिठूलाल बाफणा , सदाशिव घोडे ,बाजीराव उघडे,रामदास इचके, रितेश शहा अनेक ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ पालक,शिक्षक  व विद्यार्थी उपस्थित होते.  कवठे येमाई येथील  न्यू इंग्लिश स्कुल  व जुनिअर  कॉलेज मध्ये शिक्षण घेणा-या व इयत्ता १० वी  १२ वी च्या आगामी परीक्षेस बसलेल्या   विद्यार्थ्याचा  शुभ चिंतन  व निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.  प्रास्ताविक प्रा.संजय चौधरी यांनी केल्यानंतर  इयत्ता  १० वी  १२ वी च्या  परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यानी  आपली मनोगते व्यक्त करताना ज्या शाळेत आत्ता पर्यंत शिकलो ती  शाळा  व  येथील शिक्षकांप्रती आदराची भावना व्यक्त केली.   विद्यार्थ्याना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे म्हणून  आपल्या मूळ गावातील रयत शाळेच्या  सर्वागींण विकासात्मक  प्रगतीचा  ध्यास घेतलेले सेवानिवृत्त प्राचार्य किसनराव रत्नपारखी सर यांनी आतापर्यंत  सुमारे १०  लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य या शाळेस मिळवून दिलेलं आहे .  ज्या शाळेतून  मी शिक्षण घेतले व रयत शिक्षण संस्थेत  विविध पदांवर कार्यरत राहून  माझा व पर्यायाने माझ्या कवठे येमाई या मूळ गावाचा नावलौकिक केला  त्या शाळेच्या प्रती सदभावना व शाळेच्या ऋणातून  थोडेफार उतराई होता यावे म्हणून सेवा निवृत्ती नंतर ही  गावाच्या रयत शाळेचा सर्वागींण कायापालट करण्याचा ध्यास घेतला आहे. मागील २ वर्षांपूर्वी  येथील हायस्कुल शाळेची जळालेली जुनी इमारत आता नवीन व अद्ययावत रूपात उभी रहात आहे. या कामी रत्नपारखी सरांनी हडपसर,पुणे, मांजरी बुद्रुक परिसरातील त्यांच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून व रयत शिक्षण संस्थेच्या माध्यामातून भरीव आर्थिक योगदान मिळवून दिले आहे. आज ही त्यांनी  या शाखेस ११ हजार रुपयांची देणगी प्राप्त करून दिली आहे.
          या वेळी पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे ,मिठूलाल बाफणा,  प्राचार्य रशीद मोमीन  यांनी विद्यार्थ्यानी परीक्षेस कसे सामोरे जावे,उज्वल भवितव्यासाठी आयुष्यामध्ये ध्येय निश्चिती कशी करावी व त्यासाठी प्राधान्याने कोणत्या गोष्टींचा प्रकर्षाने विचार करावा या विषयी सविस्तर विचार मांडले.  या वेळी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना प्रमुख अतिथी प्रा. प्रशांत खामकर म्हणाले कि, सर्व प्रथम आपल्याकडे ध्येय निश्चिती हवी. कुठल्या क्षेत्रातून आपल्याला पाहिजे असलेल्या  यशाचे उंच शिखर प्राप्त होऊ शकेल  व ते मिळविण्यासाठी कुठल्या प्रकारची तयारी गरजेची आहे याला विद्यार्थी अवस्थेतच  प्रत्येकाने महत्व देणे अत्यंत गरजेचे आहे . करिअर निश्चिती करताना प्रत्येकाने आपली आवड ,कौश्यल्य , व्यक्तिमत्व,,घराची परिस्थिती, ठिकाण या सर्व बाबींचा विचार करणे ही तितकेच महत्वाचे  असल्याचे या वेळी विद्यार्थ्याना  मार्गदर्शन करताना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. परवीन इनामदार यांनी केले

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

काँग्रेसच्या एसी, एसटी आमदारांच्या संख्येत दुपटीने वाढ

नवी दिल्ली – दलित मतदारांमध्ये नाराजी निर्माण झालेल्या या मोठ्या मतदाराला पुन्हा आकर्षित करण्यास काँग्रेस यशस्वी ठरली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यांत...
Read More
post-image
महाराष्ट्र

सोशल मीडियावर पोलिसांची नजर

पुणे – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये सोशल मीडियावर जोरदार धुमश्चक्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर पोलिसांची नजर राहणार आहे. राजकीय नेत्यांचे फोटो मॉर्फिंग,...
Read More
post-image
देश

‘मोदी हटाओ, योगी लाओ’ लखनऊत पोस्टरबाजी

लखनऊ – तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवानंतर लखनऊमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान बनवा असे पोस्टर झळकले आहेत. उत्तर प्रदेश नवनिर्माण...
Read More
post-image
देश

वेगळा धर्म म्हणून मान्यता जंतरमंतरवर जोरदार आंदोलन

नवी दिल्ली – लिंगायत समाजाला हिंदू धर्मापेक्षा वेगळा व स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्या, या मागणीसाठी आज दिल्लीच्या जंतरमंतरवर लिंगायत समाजाने जोरदार आंदोलन केले....
Read More
post-image
मुंबई

ठाणे विभागात वर्षभरात शिवशाहीचे 26 अपघात

ठाणे- प्रवाशांना वाजवी दरात वातानुकुलित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देण्यासाठी एसटी प्रशासनाने शिवशाही बस आणल्या तरी एसटीच्या ठाणे विभागातील शिवशाही बसचे वर्षभरात 26 अपघात...
Read More