देवेन भारती राज्याचे नवे एटीएस प्रमुख! 19 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या – eNavakal
News मुंबई

देवेन भारती राज्याचे नवे एटीएस प्रमुख! 19 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

मुंबई- राज्य सरकारने अपर पोलिस महासंचालक आणि विशेष महानिरीक्षक पदाच्या 19 अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. आयपीएस देवेन भारती यांना पदोन्नती देण्यात आली असून त्यांच्याकडे राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या अपर पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देवेन भारती हे आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त होते. दहशतवादविरोधी पथकाचे विद्यमान अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. पुण्याचे अपर पोलीस महासंचालक संजीव सिंघल यांची मुंबईत बदली झाली आहे. मुंबईत अपर पोलीस महासंचालकपदी असलेल्या डॉ. प्रज्ञा सरवदे यांची पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित विभागाच्या प्रमुख पदी बदली करण्यात आली आहे. तर गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनाही बढती देण्यात आली असून ते आता मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक म्हणून काम पाहतील. सध्याचे फोर्स वनचे प्रमुख डॉ. सुखविंदर सिंह यांना या नव्या अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन पदावर बढती मिळाली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा

श्रीनगर – भारतीय सुरक्षा यंत्राणांच्या हाती मोठे यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा सुरक्षा यंत्रणांनी चकमकीत खात्मा केला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरला पुन्हा भूकंपाचे धक्के

पालघर – मागील अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के सहन करणाऱ्या पालघरमध्ये आजही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही मात्र आतापर्यंत जाणवलेल्या धक्क्यांमुळे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

मोदी ‘या’ दिवशी घेणार पंतप्रधानपदाची शपथ

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक २०१९चे निकाल काल जाहीर झाले. भाजपाच्या ऐतिहासिक विजयाने सर्वसामान्यांसह सर्वांनाच थक्क केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि एनडीएने देशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

भाजपाच्या विजयानंतर मोदींनी अडवाणी, जोशींची घेतली भेट

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची...
Read More