दूध दरवाढ आंदोलनाला मनसेचा सक्रीय पाठींबा जाहीर – eNavakal
आघाडीच्या बातम्या आंदोलन राजकीय

दूध दरवाढ आंदोलनाला मनसेचा सक्रीय पाठींबा जाहीर

मुंबई -दुध उत्पादक शेतकर्‍यांना प्रति लिटर पाच रूपये दर मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी आजपासून मुंबईचे दुध रोखण्याचा इशारा दिला होता. काल मध्यरात्री पंढरपूरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर दुग्धाभिषेकाने या आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हे दूध आंदोलन आज राज्यभर पेटले. या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे असे सांगून शेतक-यांनी दुधाची नासाडी करू नये असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे. तर काँग्रेस पाठोपाठ आता मनसेनेही या आंदोलनाला सक्रीय पाठींबा दर्शविला आला आहे. मनसेने परिपत्रक काढून जाहीर पाठींबा देणार असल्याचे सांगितले आहे. आंदोलनात आजपासून सक्रीय सहभाग घेत असल्याचं या परिपत्रकात म्हटलं आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आरोग्य देश

बिहारमध्ये मेंदूज्वरामुळे १३२ जणांचा बळी

पाटणा – बिहारमध्ये मेंदूज्वर तापाचा कहर अद्यापही सुरुच असून यामुळे मृतांची संख्या १३२ वर पोहोचली आहे. तसेच इतर रुग्णालयांमध्ये उपचारांविना मृत्यू झालेल्या मुलांची आकडेवारीही अद्याप...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणीप्रश्नावरून विधानसभेत गदारोळ! १५ मिनिटे तहकूब

मुंबई – अधिवेशनाचा चौथ्या दिवशी आज विधानसभेत पाणीप्रश्नावरून प्रचंड गदारोळ झाला असून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई हवामान

दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन

मुंबई – राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी जनता मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होती. त्यामुळे जनतेला आता दिलासा मिळाला आहे. कारण मान्सून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : शिव VS पराग आणि नेहा

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्यात बरीच भांडणंं, वाद विवाद, आरोप–प्रत्यारोप सुरू आहेत. या टास्कमध्ये जिंकण्यासाठी बिग बॉस...
Read More
post-image
देश

लखनऊत वर्‍हाडाची गाडी कोसळली! २२ जणांना वाचवले, ७ मुले बेपत्ता

लखनऊ – उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये आज सकाळी लग्नातून परतणाऱ्या वर्‍हाडाच्या गाडीला भीषण अपघात झाला. ही गाडी इंदिरा कालव्‍यात कोसळली. या गाडीत एकूण २९ वर्‍हाडी होते. त्यापैकी...
Read More