दुश्मन घरातच आहे? – राज ठाकरे – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

दुश्मन घरातच आहे? – राज ठाकरे

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज तेरावा वर्धापन दिन आहे. या दिनानिमित्त जनतेला संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकांविषयी माझा निर्णय तुमच्यासमोर नंतर जाहीर करेन पण झालेल्या घटनांचा जरा आढावा घेतो असे म्हणत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. गेल्या ५ वर्षात सरकारने इतके विषय देऊन ठेवलेत की एका भाषणात काही होणार नाही असे म्हणून त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे आणि जुनं विसरण्यासाठी नवं काहीतरी घडवलं जातंय, असे ते म्हणाले. नवाझ शरीफांच्या वाढदिवसाला मोदी गेले होते यावरूनही त्यांनी मोदींवर टीका केली. तसेच पुलवामा हल्ल्यानंतरचे मोदींचे विविध सभेतील आनंदी असतानाचे फोटोही त्यांनी दाखवले. मुख्य म्हणजे पुलवामा हल्ला हा मोदी सरकारने रचलेला कट असल्याची शंका त्यांनी उपस्थित केली. शिवाय दुश्मन घरातला आहे की बाहेरचा आहे हे एकदा कळू दे असेही ते म्हणाले. राफेल घोटाळ्यावरूनही त्यांनी मोदींवर तोफ डागली. तसेच पुढल्या एक दोन महिन्यात पुन्हा दहशतवादी हल्ला करण्यात येईल असेही त्यांनी म्हटले. राज यांचे हे भाषण ऐकताना जनतेतून ‘चौकीदार चोर है’ या घोषणा सुरूच होत्या.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आर्थिक सल्लागार अजित डोवाल यांच्या मुलाच्या कंपनीत एक अरब आणि एक पाकिस्तानी पार्टनर आहे. हे इतर कोणाच्या बाबतीत असतं तर भाजपाने किती टीका केली असती असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More