दुबई मास्टर्स कबड्डी : भारताची विजेतेपदासाठी आज इराणशी झुंज – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

दुबई मास्टर्स कबड्डी : भारताची विजेतेपदासाठी आज इराणशी झुंज

दुबई – दुबईत पार पडत असलेल्या ६ निमंत्रीत देशांच्या दुबई मास्टर्स कबड्डी स्पर्धेत भारताने दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेत अजय ठाकूरच्या नेतृत्वाखाली खेळवण्यात येणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण कोरियाचा ३६-२० असा एकतर्फी पराभव करताना अंतिम फेरीत धडक मारली. आता जेतेपदासाठी शनिवारी होणाऱ्या सामन्यात भारतापुढे झुंजार इराणचे कडवे आव्हान असेल.

सामन्याच्या सुरुवातीला कोरियाच्या संघाने अनपेक्षितरित्या आघाडी घेत भारतीय संघाला धक्का दिला होता. मात्र, कर्णधार अजय ठाकूर आणि गिरिश एर्नाक यांच्या जबरदस्त खेळाच्या जोरावर भारताने मध्यंतराला १६-९ अशी मोठी आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर कोरियाकडून थोडाफार प्रतिकार झाला खरा, परंतु कसलेल्या भारतापुढे त्यांचा निभाव लागला नाही. मोनू गोयत, रिशांक देवाडीगा यांच्या चढायांमुळे कोरियाचे खेळाडू पटापट बाद होत राहिले. तर बचावफळीत महाराष्ट्राच्या गिरीश एर्नाकने आपला हिसका दाखवला. या स्पर्धेत भारताचा संघ आतापर्यंत एकही सामना हरलेला नाही आहे.

तर दुसरीकडे अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात इराणने अनुभवी पाकिस्तानचा ४०-२१ असा प्रभाव केला. आता जेतेपदासाठी आज होणाऱ्या सामन्यात भारतापुढे झुंजार इराणचे कडवे आव्हान असेल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

चांद्रयान-2 आज करणार चंद्राच्या कक्षेत प्रवेश

नवी दिल्ली – संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-2 मोहिमेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. चांद्रयान-2 ला चंद्राच्या कक्षेत पोहोचवण्यासाठी इस्त्रोचे वैज्ञानिक आज सकाळी...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

मॉल पार्किंग मोफत देण्याचा कायदा आहे का? मुंबई हायकोर्टाचा पुणे पालिकेला सवाल

मुंबई – पुणेकरांना मॉलमध्ये पार्किंग शुल्क फ्री करण्याबाबत पालिकेचा कायदा आहे का? असा सवाल उच्च न्यायालयाने आज उपस्थित केला. पार्किंगचे शुल्क वसूल करण्यास मनाई...
Read More
post-image
News मुंबई

वर्सोवा ते लोखंडवाला रस्त्याच्या बांधकामात कांदळवनांचा बळी

मुंबई – मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येणार आहे. परंतु या मार्गासाठी कांदळवनांचा बळी जाणार असल्याचा...
Read More
post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More