दुबई कराटे स्पर्धेत श्रेयस वाडेकरला दोन सुवर्ण – eNavakal
क्रीडा देश

दुबई कराटे स्पर्धेत श्रेयस वाडेकरला दोन सुवर्ण

मुंबई,

दुबई येथे आहिल क्लब स्टेडियममध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत नवी मुंबईच्या सी-वूड येथे राहणार्‍या श्रेयस विजयकुमार वाडेकरने दोन सुवर्ण पदकांची कमाई केली.
नवी मुंबईतील खेळाडूंनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना 17 सुवर्ण, 6 रौप्य पदके जिंकली. या
स्पर्धेत भारतासह सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, श्रीलंका, भूतान, कतार, उमान, कुवेत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियातील 850 पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले होते. काता-कूमिते या दोन प्रकारात स्पर्धा संपन्न झाल्या.
मुंबईतील साई स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी संलग्न इंटरनॅशनल इंडो रिओ कराटे फेडरेशन यास संस्थेच्या 28 खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. तर भारतातील 242 खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. नवी मुंबईतील पदक विजेत्या खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन
होत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

लातूरात वाळू तस्करांवर 13 लाखांची दंडात्मक कारवाई

लातूर- मांजरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करावर लातूर तहसीलदारांनी कारवाई केली. यामध्ये नऊ वाहने जप्त करीत तब्बल 13 लाखांचा दंड वसूल करण्यात...
Read More
post-image
News देश

तुंगनाथ तीर्थक्षेत्र लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार

रुद्रप्रयाग – रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तृतीय केदार तुंगनाथ तीर्थक्षेत्रही लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो पर्यटक येतात. यासोबतच क्रौंच पर्वतावरील कार्तिक स्वामींचे मंदिरदेखील झळाळणार...
Read More
post-image
News देश

नवी दिल्ली-चंदिगढ रेल्वे प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आणि पंजाब-हरियाणा राज्यांची राजधानी चंदिगढ यांच्यामधील प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार आहे. या प्रवासाचा फक्त वेळच कमी...
Read More
post-image
News देश

राफेल विमान खरेदी! राहुल गांधी आज करणार नेत्यांशी चर्चा

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चालू असलेले राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन भाजपाला घेरण्यासाठी आज राहुल गांधी या विषयासंदर्भात...
Read More
post-image
क्रीडा

भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार – श्रीजेश

जकार्ता – आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले. स्पर्धेपूर्वी आज...
Read More