गुन्हे मुंबई

दुचाकी वाहनांची चोरी करणार्‍या तीन टोळ्यांचा पर्दाफाश सहा आरोपींना अटक, बारा चोरीचे मोटासायकल जप्त

मुंबई – दुचाकी वाहनांची चोरी करणार्‍या तीन टोळ्यांचा कुरार, वनराई आणि समतानगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने पर्दाफाश केला आहे. या टोळीतील सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यात एका सतरा वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. या सहाही आरोपींकडून विविध ठिकाणाहून चोरी केलेले बारा मोटासायकल जप्त करण्यात आले आहेत. कांदिवलीतील प्रथम कॉलेजच्या गेटसमोर पार्क केलेली कृष्णा महावीर पाल याची एक मोटारसायकल चोरट्यांनी 29 जानेवारीला चोरी केली होती. याप्रकरणी समतानगर पोलिसांत गुन्हा नोंद होताच सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष वेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल माने यांच्या पथकातील आंधळे, रणशेवरे, हरड, पालवे, शिवलकर, अकबर यांनी आनंद रामनरेश जैस्वाल या तरुणासह त्याचा सतरा वर्षांचा मित्र याला अटक केली होती. चौकशीत त्यांनी समतानगर येथून दोन, गोरेगाव आणि कांदिवलीतून चार मोटासायकल चोरी केल्याची कबुली दिली. या चारही मोटासायकल नंतर पोलिसांनी जप्त केल्या. दुसर्‍या घटनेत शमीम अहमद ऊर्फ सलमान आदिल अहमद बेग या संशयित आरोपीस कुरार पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत तो मोटासायकल चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडून पोलिसांनी पठाणवाडी, जिजामाता स्कूल, बीएमसी गार्डन, तानाजी नगर येथून चोरी केलेल्या तीन मोटारसायकल जप्त केल्या आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष वेळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय राजेशिर्के यांच्या पथकातील घार्गे, कदम, जाधव, कावले, सावंत, पोघर, मोरे, आहेर, पाईकराव यांनी केल्याचे पोलिसांनी सांगितले. तिसर्‍या घटनेत तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली. दिपक भिमराव खरात, सुशील ऊर्फ सचिन गणेश काटवले आणि सुरज महादेव लोणार अशी या तिघांची नावे आहेत. अशी या तिघांची नावे असून ते तिघेही भिवंडी परिसरात राहतात. मोटासायकल चोरीसाठी ते तिघेही मुंबईत येत होते. चोरी केलेल्या मोटारसायकलवर फेरफटका मारुन ते मोटारसायकल तेथून टाकून पळून जात होते. त्यांच्या अटकेने पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून सुमारे अडीच लाख रुपयांचे पाच चोरीचे मोटारसायकल पोलिसांनी जप्त केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अपघात विदेश

पेरू देशात दरीत बस कोसळून 44 जणांचा मृत्यू

लीमा – पेरूच्या अरेक्विपा मध्ये  एक बस डोंगर दरीत कोसळली. या भीषण अपघातात 44 प्रवाशांच्या मृत्यू झाला आहे . तसेच 24 जण जखमी आहे. त्यातही 3 चिमुकल्यासंह...
Read More
post-image
News महाराष्ट्र राजकारण

शिवसेनाही परळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणार

बीड – नेहमीच राज्याचे  लक्ष लागून असते  त्या परळी विधानसभेची निवडणूक यावेळी शिवसेनाही लढणार आहे. ”निवडणूक लढवण्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला...
Read More
post-image
देश राजकारण संरक्षण

लष्करप्रमुखांनी राजकीय विषयात हस्तक्षेप करू नये- असुदद्दीन ओवेसी

नवी दिल्ली- बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमातून आसामच्या राजकीय हालचालींन बाबत वक्तव्य केले होते, या वक्तव्याचे प्रतिउत्तर देत, लष्करप्रमुखांनी राजकीय विषयात हस्तक्षेप करू नये असे...
Read More
post-image
न्यायालय विदेश

नवाझ शरीफांची पक्षप्रमुख पदावरून न्यायालयाने केली हकालपट्टी

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानेही नवाझ शरीफ यांची पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएलएम)पक्षाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शरीफ यांना गेल्या वर्षी न्यायालयाने पदच्युत केले होते. पंतप्रधानपदावरून...
Read More