दुकानात प्लास्टिक आढळल्यास दुकानाचा परवाना रद्द होणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दुकानात प्लास्टिक आढळल्यास दुकानाचा परवाना रद्द होणार

मुंबई – राज्यात प्लास्टिकबंदी व्हावी यासाठी राज्यसरकारने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. दुकानात प्लास्टिक पिशवी आढळल्यास दुकानाचा परवाना रद्द कऋण दुकानाला टाळ ठोकण्यात येणार असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज प्लास्टिक संदर्भातील बैठक पार पडली. यावेळी प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी
पर्यावरण खात्याला कठोर पावले उचलण्याचे आदेश देण्यात आल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. यानुसार प्लास्टिक वापरणार नसल्याचे दुकानदारांकडून प्रतिज्ञापत्रावर लिहून घेतलं जाणार आहे. संधी देऊनच ही कारवाई करण्यात येणार असल्याचेही कदम म्हणाले. राज्यात काही महिन्यांपूर्वी प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. तसेच जुना स्टॉक संपविण्यासाठी दुकानदारांना तीन महिन्यांची मुदतही देण्यात आली होती. मात्र, दुकानदारांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने कठोर पावले उचलली असल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

महाजनादेश यात्रेवर कांदे फेकण्याचा इशारा; आंदोलनकर्ते ताब्यात

नाशिक – महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कोंबड्या फेकल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच सांगलीत घडलेली असताना महाजनादेश यात्रेच्या वाहनांवर कांदे फेकण्याचा आणि यात्रा...
Read More
post-image
देश

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंद – केंद्राची सूचना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्क्रमातून ‘प्लास्टिकमुक्त अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली होती. महात्मा गांधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More