दीर्घकालीन रस्त्यांसाठी जिओ टेक्स्टाईल मटेरियलचा प्रयोग – eNavakal
महाराष्ट्र

दीर्घकालीन रस्त्यांसाठी जिओ टेक्स्टाईल मटेरियलचा प्रयोग

परभणी – ग्रामीण भागातील रस्ते दीर्घकालीन टिकावेत म्हणून आता जिओ टेक्स्टाईल मटेरियल टाकून रस्ता तयार केला जात आहे. राज्यातील पहिला प्रयोग परभणीत करण्यात येत आहे, अशा पद्धतीने रस्ता तयार करण्याची राज्यातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे रस्ते खराब होणार्‍याचे प्रमाण कमी होईल.

डांबरी रस्ता तयार केल्यानंतर खालच्या काळ्या माती आणि पाण्यामुळे काही काळातच हा रस्ता खड्डेमय होतो, अनेक ठिकाणी खचला जातो. वारंवार रस्ता करुनही काही दिवसातच ते रस्ते पुन्हा जशास तसेच होतात. मात्र यावर आता शासनाने पर्याय शोधलाय जे डांबरी रस्ते काळी माती आणि पाण्यामुळे तग धरत नव्हते ते यापुढे जिओ टेक्स्टाईल मटेरिअल या नवीन तंत्राद्वारे दीर्घकाळ टिकतील, असा दावा करण्यात आला आहे. परभणीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत साडेगाव ते मांगणगाव या सहा किलोमीटरच्या रस्त्याचे काम 4 कोटी 98 लाख रुपये खर्चून केला जात आहे, ज्यात जिओ टेक्स्टाईल मटेरिअलच्या चादरचा वापर होत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज अखेर दिवाळखोरीत

नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेज कंपनी अखेर दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्याबाबत एकाही...
Read More