नवी दिल्ली – बॉलीवूडची मस्तानी दीपिकाने पहिल्यांदा ‘ओम शांती ओम’ या सुपरहिट चित्रपटातील शांती साकारली, त्यानंतर तिने बॉलीवूडला अनेक दर्जेदार भूमिका दिल्या. तिच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं पण दीपिकाला मात्र भविष्यात प्रिन्सेस डायनाची व्यक्तिरेखा साकारायची आहे. अलीकडेच एका मुलाखतीत तिने ही इच्छा व्यक्त केली.
‘प्रिन्सेस डायनाच्या निधनाची बातमी ऐकून मी जितकी रडले तितकी मी याआधी कधीच रडले नाही, असे म्हणत दीपिकाने सांगितले की, प्रिन्सेस डायनाचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. ‘आजही मी तिचे व्हिडिओ बघते. ती लोकांशी कशी भेटत असे, कशी बोलत असे, हे सगळे मी नोट करते.’ दरम्यान लवकरच दीपिका ‘छपाक’ या चित्रपटातून अॅसिड हल्ल्यातून बचावलेली लक्ष्मी अग्रवाल हिची भूमिका साकारताना दिसणार आहे.