दीपिकाचा सुपारीबाज भाजपात परतला – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन राजकीय

दीपिकाचा सुपारीबाज भाजपात परतला

नवी दिल्ली – संजय लीला भन्साली दिग्दर्शित चित्रपट ‘पद्मावत’ अनेक वादांतून २०१८च्या सुरुवातीला प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाला सर्वच स्तरातून इतका विरोध झाला की, चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण हीच्या शीरच्छेदाची धमकीही देण्यात आली. अशी धमकी संजय लीला भन्साली यांनादेखील देण्यात आली होती. धमकी देणारे भाजपाचे सुरजपाल अमू यांनी पदाचा राजीनामा दिला. मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांनी पत्र जाहीर करून त्यांचा राजीनामा नाकारला आहे. त्यामुळे सुरजपाल आता भाजपाच्या प्रवक्तापदावर कायम राहणार आहेत.

सुरज पाल यांनी दीपिका आणि संजय लीला भन्साली यांचा शीरच्छेद करणाऱ्यास १० करोड रुपयांचे बक्षीस मिळेल, असे वक्तव्यही केले होते. तसेच पद्मावत चित्रपटाविरोधात मोर्चा देखील काढला होता. यावेळी त्यांना अटकही झाली होती.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

#MeToo यशराज फिल्म्सच्या उपाध्यक्षकाची पदावरून हकालपट्टी

मुंबई – #MeToo मोहिमेंतर्गत यशराज फिल्म्सचे उपाध्यक्ष आशिष पाटील यांना पदावरून काढण्यात आले आहे. एका महिलेने आशिष पाटीलवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पाटील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

ठग्स ऑफ हिंदुस्तानचे ‘वाश्मल्ले’ गाणे पाहिले का?

मुंबई – बिग बी अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान’ हे दोघे पहिल्यांदाच ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटाच्या माध्यमातून सोबत काम करत आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दिवाळीत साखर स्वस्त होणार

मुंबई – दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळ निघत अशी आरडाओरड करणाऱ्या रेशनकार्ड धारकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. साखर आणि डाळीच्या दरात घट करण्यात आली असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात वाढ

दिल्ली – केंद्र सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात ०.४ टक्के इतकी वाढ केली आहे. यामुळे व्याजदर...
Read More