दीड दिवसांच्या बाप्पाला गणेशभक्तांकडून भावपूर्ण निरोप – eNavakal
News मुंबई

दीड दिवसांच्या बाप्पाला गणेशभक्तांकडून भावपूर्ण निरोप

मुंबई- दीड दिवसाच्या पाहुण्या बाप्पाला मुंबईसह महाराष्ट्रात गणेशभक्तांनी आज वाजत – गाजत निरोप दिला. लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी ठिकठिकाणी घरगुती गणपतींच्या मिरवणुका निघाल्या होत्या. मुंबईत सायंकाळपर्यंत कृत्रिम तलावात सार्वजनिक मंडळाचे 3 तर घरगुती 2339 गणपती मूर्तींचे विसर्जन संपन्न झाले होते. मुंबईत दीड दिवसांचे एकूण 9784 गणेश मूर्तींचे विसर्जन होणार असून त्यापैकी सार्वजनिक 37 तर घरगुती 9747 गणपतींचा समावेश आहे.

नवी मुंबईतदेखील दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे वाशी जागृतेश्वर तलावात विसर्जन करण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली होती. डहाणू तालुक्यातील आदिवासी बांधवांनी दीड दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान तारपानृत्य करून आनंद लुटाला आहे. मुंबईत दादर चौपाटी, जुहू आणि गिरगाव चौपाटीच्या दिशेने देखील घरगुती गणपती विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या होत्या.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

हे सरकार फसवे, या सरकारला मतदान करणार नाही- मराठा भगिनी

मुंबई – मुंबईतील आझाद मैदानात गेल्या 16 दिवसांपासून सकल मराठा क्रांती मोर्चाचे आपल्या मागण्यांसाठी उपोषण सुरू होते.  सरकारच्यावतीने आलेले राज्यमंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर अखेर १६...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडातील माहुरात फर्निचर गोदामास आग, लाखोंचे नुकसान

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर शहरातील आबासाहेब पारवेकर नगर स्थित फायबर फर्निचर साहित्य असलेल्या गोदामास आज सकाळी ७च्या सुमारास भीषण आग लागली. यात...
Read More
post-image
देश

अमृतसरमध्ये धार्मिक स्थळ परिसरात स्फोट; तिघांचा मृत्यू

अमृतसर – धार्मिक स्थळ परिसरात स्फोट झाला असून स्फोटामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ

(व्हिडीओ) ई नवाकाळचा आज पहिला वर्धापन दिन!

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (२९-०९-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (१७-१०-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

मध्य रेल्वेवर आज ६ तासांचा ‘जम्बो ब्लॉक’

कल्याण – कल्याण रेल्वे स्थानक येथील मध्य रेल्वे प्रशासन आज १०४ वर्ष जुना पत्री पूल पाडण्याचे काम हाती घेणार आहे. या जम्बोब्लॉकचे काम आज रविवारी...
Read More