दिव्यांशचा शोध आजही सुरूच! संतप्त नागरिकांचा रास्ता रोको – eNavakal
महाराष्ट्र मुंबई

दिव्यांशचा शोध आजही सुरूच! संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

मुंबई – गोरेगाव पूर्वेकडील दिंडोशी येथे आंबेडकर चौकामध्ये बुधवारी रात्री दोन वर्षांचा दिव्यांश सिंग खेळता खेळता उघड्या गटारात पडला. बुधवारी रात्रीपासून पोलीस, पालिका अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत आहेत मात्र आज शुक्रवारीही त्याचा काहीच पत्ता लागलेला नाही. नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाबरोबर दिव्यांश वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या घटनेला पालिका जबाबदार असल्याचा आरोप लोकांकडून होत आहे. गुरुवारी सकाळी येथील स्थानिकांनी रास्तारोको करुन आपला संताप व्यक्त केला. तर आज १२ वाजता गोरेगाव (पू) आंबेडकर चौकात रास्ता रोको करण्यात येणार आहे. दरम्यान, ‘माझा मुलगा भेटला नाही तर मी आत्महत्या करीन’, असा इशारा मुलाच्या वडीलांनी दिला होता. त्यानंतर पोलिसांनी मुलाच्या वडीलांना ताब्यात घेतले.

दिव्यांश सिंग आंबेडकर चौकात खेळत असताना रस्त्याच्याकडेला असलेल्या नाल्यात पाय घसरून पडला. दिव्यांश जेव्हा नाल्यात पडला, त्यावेळी या परिसरात कोणीच नव्हते. काही वेळाने त्याची आई त्याला शोधण्यासाठी आली असता, मुलाचा शोध लागत नसल्याने तिने आरडाओरड करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तेथील स्थानिकांनी तातडीने पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांना याबाबत माहिती दिल्यानंतर शोधकार्य सुरु केले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून सीसीटीव्हीमध्ये तो गटारात पडल्याचे स्पष्ट झाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शाळेच्या परीक्षेची वेळ बदलून उस्मानाबादेत उद्धव ठाकरेंची सभा

उस्मानाबाद – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबादमधील प्रचारसभेसाठी शाळेच्या परीक्षेची वेळ बदलल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचाच...
Read More