दिवाळीत एसटीचे प्रवास महागणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दिवाळीत एसटीचे प्रवास महागणार

मुंबई – दिवाळी सुट्टीच्या कालावधीत  १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर दरम्यान राज्य परिवहन महामंडळाने सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ २० दिवसांसाठी लागू असणार आहे.

गेल्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीतच सेवाप्रकार निहाय २०, १५ व १० टक्के अशी भाडेवाढ करण्यात आली होती. मात्र यावर्षी  १० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. एस. टी. महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने ३० टक्के पर्यंत भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे. त्यानुसार दिवाळी सुट्टीच्या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपाची भाडेवाढ करण्यात येते. यंदा यानुसारच दरवर्षीप्रमाणे सेवाप्रकार निहाय २०, १५ व १० टक्के अशी भाडेवाढ न करता सर्व सेवा प्रकारासाठी केवळ २० दिवसासाठी सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्यात आली असून सदर भाडेवाढ ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा

श्रीनगर – भारतीय सुरक्षा यंत्राणांच्या हाती मोठे यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा सुरक्षा यंत्रणांनी चकमकीत खात्मा केला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरला पुन्हा भूकंपाचे धक्के

पालघर – मागील अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के सहन करणाऱ्या पालघरमध्ये आजही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही मात्र आतापर्यंत जाणवलेल्या धक्क्यांमुळे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

मोदी ‘या’ दिवशी घेणार पंतप्रधानपदाची शपथ

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक २०१९चे निकाल काल जाहीर झाले. भाजपाच्या ऐतिहासिक विजयाने सर्वसामान्यांसह सर्वांनाच थक्क केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि एनडीएने देशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

भाजपाच्या विजयानंतर मोदींनी अडवाणी, जोशींची घेतली भेट

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची...
Read More