मुंबई – दरवर्षी शाळांना २० दिवस असणारी दिवाळीची सुट्टी यंदा पंधराच दिवस मिळणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण विभागाने केली आहे. यंदा धनत्रयोदशीपासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरपर्यंत शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच शाळांचे द्वितीय सत्र २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
परंतु, शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या दिवाळीच्या सुट्टीवरून शिक्षक तसेच पालक वर्गातही नाराजी पसरली आहेे. धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीच्या पहिल्याच दिवशीपासून सुट्टी देण्यात असल्याने पूर्वतयारीसाठी वेळ मिळणार नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे दिवाळीच्या तीन दिवस आधी सुट्टी देण्याची मागणी करण्यात येत आहे.