दिल्ली सरकार घरपोच ४० सुविधा देणार – eNavakal
News Uncategoriz देश

दिल्ली सरकार घरपोच ४० सुविधा देणार

नवी दिल्ली – भारताची राजधानी दिल्ली येथे डोर स्टेप डिलिवरी योजना राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी या योजनेचा शुभारंभ केला आहे. विशेष म्हणजे ही योजना जगात पहिल्यांदाच राबविली जात आहे. याद्वारे विविध प्रकारच्या ४० सेवा उपभोक्त्यांच्या घरी पुरविण्यात येणार आहेत. या सेवांमध्ये जाती प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स परवाना, लग्ननोंदणी, पाणीपट्टीसाठी आवेदन सारख्या अन्य सेवांचा यामध्ये समावेश असणार आहे. या सेवा सुरुवातीला दिल्ली सरकार पुरविणार असून या सेवांचा आकडा ७० वर जाईल असा दावा उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे. सध्या या ४० सेवा घराघरांत पोहचविण्यात येत आहेत यासाठी २०१७ मधेच २५ लाख आवेदन आले होते.

डोर स्टेप डिलिव्हरी योजनेचा शुभारंभ करताना केजरीवाल यांनी सांगितले की, अशी योजना अमलात आणण्याची कल्पना गोपाल मोहन यांनी दिली आहे. गोपाल मोहन हे त्यांचे टेक्निकल सल्लागार आहेत. त्यांनी या योजनेचा पूर्ण अभ्यास करूनयावर काम सुरु केले. यानुसार नागरिकांना एक नंबर दिला जाणार आहे. त्यावर फोन करून ग्राहक हवी ती सेवा प्राप्त करण्यासाठी संबंधित व्यक्तीला घरी बोलवू शकणार आहेत.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र राजकीय

बीडमध्ये काकांच्या कारभारावर पुतण्याचा बॅनरबाजीतून निशाणा

बीड- बीडच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच काका-पुतणे आमने-सामने उभे राहणार असल्याने त्यांच्यातील संघर्ष गल्लीबोळातही दिसू लागला आहे. राज्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विकासकामांवर त्यांचे पुतणे संदीप...
Read More
post-image
News देश राजकीय

काँग्रेससोबत युती नको, स्वतंत्र लढणार – देवेगौडा

बंगळुरू- कर्नाटकामध्ये मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहू, असे माजी पंतप्रधान आणि जनता...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा पूर्ववत

उरण- उरण ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे गेल्या 10 दिवसांपासून बंद असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा कालपासून पूर्ववत सुरू झाला आहे. यामुळे एका...
Read More
post-image
News महाराष्ट्र वाहतूक

बोरोटी रेल्वे यार्डमध्ये ब्लॉक! कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रद्द

सोलापूर- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर वाडी सेक्शनच्या बोरोटी रेल्वे स्थानक यार्डमध्ये उद्या बुधवारी ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवासी गाड्यांमध्ये...
Read More
post-image
News महाराष्ट्र राजकीय

इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा! बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर- संगमनेरयेथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज दिसल्यानंतर ते बाळासाहेबांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त...
Read More