दिल्ली विद्यापीठ निवडणुकीतही अभाविपच्या बाजूने ईव्हीएम मशीन? – eNavakal
देश निवडणूक

दिल्ली विद्यापीठ निवडणुकीतही अभाविपच्या बाजूने ईव्हीएम मशीन?

नवी दिल्ली – राजधानी दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीमध्ये भाजपा संलग्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मुसंडी मारली आहे. आज या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. काँग्रेसच्या एनएसयूआय या संघटनेला एका जागेवर समाधान मानावे लागले. विद्यापीठ निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात आला आणि त्यामध्ये गोंधळ झाल्याचा आरोप एनएसयूआय संघटनेने केला आणि फेर निवडणुकीची मागणी केली.

भाजपप्रणीत एबीव्हीपी संघटनेच्या खात्यात अध्यक्षपदासह तीन महत्त्वाची पदे आली आहे. एनएसयूआय संघटनेकडे सचिवपद गेले आहेत. विद्यापीठ निवडणुकीत अध्यक्षपदी अंकीत बसोया विजयी झाले. उपाध्यक्षपदी शक्तीसिंह तर सहाय्यक सचिवपदी ज्योती चौघरी विजयी झाले आहेत. बसोया यांनी 1744 मतांनी विजय प्राप्त केला. शक्तीसिंह यांनीही सर्वाधिक 7673 मतांनी विजय मिळविला. राष्ट्रवादी विचारधारेचा हा विजय आहे. विभाजनवादी राजकारणाविरोधातील युवा वर्गाचा हा कौल आहे, असे एबीव्हीपीने म्हटले आहे.
मात्र या निवडणुकीत ईव्हीएम मशीन वापरून गोंधळ घातल्याचा आरोप एनएसयूआयने केला. त्यांच्या प्रतिनिधीने सांगितले की, एका पदासाठी 9 उमेदवार असताना मशीनवर दहा उमेदवार दाखवले होते. इतकेच नव्हे तर या दहाव्या अज्ञात उमेदवाराला मतेही पडली. यामुळे आम्ही मतमोजणी वारंवार थांबवली. पण शेवटी त्यांनी निर्णय जाहीर केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

मला वडिलांच्या लग्नाला आईने तयार केले – सारा

नवी दिल्ली – कॉफी विथ करन सीजन ६ मध्ये अलीकडेच अभिनेता सैफ अली खान आणि त्याची मुलगी अभिनेत्री सारा अली खान दोघे आले होते....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

विराटला कोणतीच ताकीद दिली नाही – बीसीसीआय

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला माध्यमे आणि चाहत्यांशी नम्रतेने वाग अशी ताकीद बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने दिली असे वृत्त काही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

सई आणि ‘तो’

मुंबई – मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरच्या एका फोटोची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सईने एका तरुणासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. सईनं या फोटोकॅप्शनमध्ये पिवळ्या हार्ट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

नाशिक-कल्याण प्रवास अधिक सोयीचा होणार

नाशिक – प्रवाशांना नाशिक-कल्याण प्रवास आता अधिक सोयीचा होणार आहे. कारण लवकरच नाशिक-कल्याण लोकल सुरू होणार आहे. येत्या 15 दिवसांत या लोकलची चाचणी घेण्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

अकोले तालुक्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या

अकोले – अकोले शहरातील उपनगरातील गजबजलेल्या परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एकाच वेळी सहा ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून घरफोड्या केल्या. या सहा ठिकाणी...
Read More