दिल्लीने युनायटेडला हरवले – इंडियन सुपर लीग – eNavakal
क्रीडा देश

दिल्लीने युनायटेडला हरवले – इंडियन सुपर लीग

गुवाहाटी – हिरो इंडियन सुपर लिगमध्ये तळातील दोन संघांमधील लढतीत अखेर निर्णायक निकाल लागला. यात अखेरच्या दहाव्या क्रमांकावरील दिल्ली डायनॅमोजने शेवटून दुसऱ्या म्हणजे नवव्या क्रमांकावरील नॉर्थईस्ट युनायटेडला एकमेव गोलने हरविले. बदली खेळाडू कालू उचे याने तीन मिनिटे बाकी असताना केलेला गोल निर्णायक ठरला.
इंदिरा गांधी अ‍ॅथलेटीक स्टेडियमवरील लढतीत गोलची प्रतिक्षा अखेर तीन मिनटे बाकी असताना संपुष्टात आली. डेव्हिड एन्गाटे याने उजवीकडून चेंडू अचूक क्रॉस मारला. त्यावर कालूने ताकदवान हेडींग करीत चेंडू नेटच्या उजवीकडील खालच्या भागात अचूक मारला. त्यावर नॉर्थईस्टचा गोलरक्षक टी. पी. रेहनेशन निरुत्तर झाला. कालूला 66 व्या मिनिटास मैदानावर उतरविण्यात आले होते.
दिल्लीला विजयानंतरही तळातील स्थानावरच राहावे लागले. 14 सामन्यांत दिल्लीचा हा तिसरा विजय असून दोन बरोबरी व नऊ पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. दिल्लीचे 11 गुण झाले. नॉर्थईस्टला 15 लढतींत दहावा पराभव पत्करावा लागला. तीन विजय व दोन बरोबरींसह त्यांचे 11 गुण आहेत. दिल्लीपेक्षा त्यांचा एक सामना जास्त असला तरी गोलफरक सरस आहे. नॉर्थईस्टचा गोलफरक उणे 12 (10-22), तर दिल्लीचा उणे 15 (15-30) असा आहे.
पुर्वार्धात दहाव्या मिनिटाला नॉर्थईस्टच्या लालरिंदाका राल्टे याने मध्य क्षेत्रात चेंडू मिळाल्यानंतर हेडींगवर मार्सिनीयोला पास दिला, पण मार्सिनीयो पुढे सरसावत असतानाच ऑफसाईडचा इशारा झाला. 14 व्या मिनिटाला दिल्लीला कॉर्नर मिळाला होता. त्यावर मॅटीयस मिराबाजेने चेंडू मारला. हेडींगवर बचाव करण्यासाठी नॉर्थईस्टचे मार्सिनीयो आणि रेगन सिंग या दोघांनी उडी घेतली, पण त्यांची धडक झाली.  यात मार्सिनीयोला थोडी दुखापत झाली.
20 व्या मिनिटाला नॉर्थईस्टच्या सैमीनलेन डुंगलने चांगली संधी दवडली. त्याला पेनल्टी क्षेत्रात रेगनकडून चांगला पास मिळाला होता, पण डुंगलने आधीच फटका मारला. त्यामुळे चेंडू दिल्लीचा गोलरक्षक झेबीयर इरुतागुएना याला सहज अडविता आला. त्यानंतर डुंगलनेच उजवीकडून जास्त उंच चेंडू मारल्यामुळे मार्सिनीयोला हेडींग करता आले नाही. 25 व्या मिनिटाला दिल्लीच्या जेरॉन लुमू व मॅन्युएल अराना यांनी रचलेली चाल फिनीशिंग अभावी अपयशी ठरली. 40 व्या मिनिटाला डुंगलने उजवीकडून दिलेल्या पासवर मार्सिनीयोने मारलेल्या फटक्यात अचुकता नव्हती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More