दिल्लीत राजकीय हालचालींना वेग; चंद्राबाबू राहुल गांधींना भेटले – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

दिल्लीत राजकीय हालचालींना वेग; चंद्राबाबू राहुल गांधींना भेटले

नवी दिल्‍ली – लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचे सगळे टप्पे पूर्ण होण्याआधी दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज भेट घेतली. राहुल गांधींच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली.
राहुल गांधी आणि चंद्राबाबू नायडू यांच्यामध्ये 10 ते 15 मिनिटे चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. या भेटीत निवडणुकांनंतरच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, विरोधी पक्षांची 21 मे रोजी दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर चंद्राबाबू आणि राहुल गांधींची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. तुमच्याकडे पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? या प्रश्नावरून भाजपकडून विरोधकांना टार्गेट करण्यात येतं. त्यामुळे आता पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची 21 मे रोजी दिल्लीत बैठक होणार आहे.

भाजपविरोधी आघाडीच्या या बैठकीत पंतप्रधानपदाच्या नावाबाबत चर्चा होणार आहे. याबाबत चंद्राबाबू नायडू यांनी माहिती दिली आहे. या बैठकीला तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी, बसपा अध्यक्षा मायावती, अखिलेश यादव, शरद पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

राहुल गांधींनी लोकसभेत घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. आज वीरेंद्र कुमार यांनी हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून शपथ...
Read More
post-image
देश

#CycloneVayu २४ तासांत अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली – वायू चक्रीवादळाने दिशा बदलल्याने गुजरात आणि मुंबईसह कोकणावरील धोका टळला आहे. मात्र हे वादळ गुजरातच्याच दिशेने पुढे जाईल, असे हवामान खात्याने...
Read More
post-image
विदेश

वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकावरून हाँगकाँगच्या प्रमुखांनी मागितली माफी

हाँगकाँग – वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकाला सरकारने स्थगिती दिली असतानाही काल रविवारी हाँगकाँगमध्ये लाखो नागरिक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलकांनी हाँगकाँग नेत्याच्या राजीनाम्याची मागणी केली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या आंदोलन आरोग्य देश

ममता बॅनर्जींसोबत चर्चेसाठी डॉक्टर रवाना

मुंबई – पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज सोमवारी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यानुसार...
Read More
post-image
देश

एक देश, एक निवडणूक! मोदींनी बोलावली बुधवारी बैठक

नवी दिल्ली – प्रचंड बहुमत व देशाच्या सत्तेवर पूर्णपणे पकड निर्माण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक हादरवणारा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. ‘एक...
Read More