नवी दिल्ली – लॉकडाऊन संपेपर्यंत बहुतांशी सार्वजनिक दळणवळण व्यवस्था सुरू होणार आहे. भारतीय रेल्वे सेवा काही प्रमाणात आजपासून सुरू करण्यात आली आहे. आता राजधानी दिल्लीतील मेट्रो सेवाही सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. तसे संकेत दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिले आहेत. दरम्यान, या मेट्रोतील प्रवाशांना आरोग्य सेतू अॅप आणि मास्क अनिवार्य असणार आहे.
दिल्ली मेट्रोने आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटले आहे की, मेट्रो स्थानकांमधील जे प्रशिक्षित सफाई कामगार आहेत. ते प्रवासी रहदारीचा परिसर साफ करतील. तसेच मेट्रो सेवा सुरू झाल्यावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मेट्रो परिसरातील ईफसी गेट, लिफ्ट, इस्क्लेटर, आदी मशीनच्या साफसफाईसाठी विशेष स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, मेट्रोने प्रवास करताना संबंधित प्रवाशाच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे अनिवार्य राहणार असण्याची शक्यता आहे. तसेच प्रत्येक प्रवाशाला तोंडाला मास्क लावणे सक्तीचे राहणार आहे.