दिल्लीत आज अमित शहांनी बोलवली राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची बैठक – eNavakal
News देश

दिल्लीत आज अमित शहांनी बोलवली राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची बैठक

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी आज दिल्लीत राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची बैठक बोलवली आहे. भाजपाचे सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, संघटन मंत्री आणि राज्य प्रभारींना बैठकीसाठी बोलावले आहे. भाजपातंर्गत संघटनात्मक पातळीवर निवडणुकांची प्रक्रिया सुरु करण्यासंदर्भात ही बैठक असल्याची माहिती मिळत आहे.
नव्या भाजपा अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी राष्ट्रीय पदाधिकारी एकत्र येतील. उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांसाठी प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाईल. अलीकडेच लोकसभा निवडणुकीत भाजपाने या दोन राज्यात दमदार कामगिरी केली होती. महत्वाच्या पदांसाठी निवडणुकीसह पक्ष नोंदणी अभियानही भाजप लवकरच सुरु करणार आहे. अमित शाह यांनी भाजपाच्या सरचिटणीसाची यासाठी 18 जूनला बैठक बोलावली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

राहुल गांधी आज काश्मिरला जाणार

नवी दिल्ली- कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांसोबत आज  काश्मिरच्या दौर्‍यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांचा...
Read More
post-image
News मुंबई

विमानतळ धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश करणार्‍या तरुणाला अटक

मुंबई – विमानतळाच्या धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी एका 24 वर्षांच्या तरुणाला काल विमानतळ पोलिसांनी अटक केली. कामरान अब्दुल हलीम शेख असे या आरोपी तरुणाचे...
Read More
post-image
News मुंबई

मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवार 25 ऑगस्टला मेगाब्लॉक

मुंबई- मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवार 25 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.20...
Read More
post-image
News महाराष्ट्र

आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई – राज्यात आगामी विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असताना आता ‘आम आदमी पक्षाने’ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘आप’चे राष्ट्रीय...
Read More
post-image
News महाराष्ट्र

डीएसकेंच्या 13 महागड्या गाड्यांचा लिलाव होणार

पुणे – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी अर्थात डीएसके यांच्या 13 महागड्या गाड्या लिलावात...
Read More