दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी लक्खा सिधानाचेही नाव समोर – eNavakal
देश

दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी लक्खा सिधानाचेही नाव समोर

नवी दिल्ली – काल देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान उफाळलेल्या हिंसाचाराने संपूर्ण दिल्ली हादरली. या हिंसाचारात सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले, तर तब्बल ३००हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत २२ गुन्हे नोंदवण्यात आले असून पोलिसांकडून हिंसाचारास कारणीभूत असलेल्यांचा शोध सुरू आहे. यादरम्यान दीप सिद्धू याच्याबरोबरच गँगस्टर लक्खा सिंह सिधाना याचे नावदेखील समोर आले आहे. आंदोलनातील तरुणांना हिंसाचारासाठी भडकवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. आता दिल्ली पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याच्या विरोधातील पुरावे गोळा करत आहेत.

लक्खा सिधाना व त्याच्या सहकाऱ्यांची सेंट्रल दिल्लीत घडलेल्या हिंसाचारात महत्त्वाची भूमिका असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात पंजाबमध्ये दोन डझनहून अधिक गुन्ह्यांची नोंद असून यात हत्या, लुटमार, अपहरण, खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांचादेखील समावेश आहे. याचबरोबर त्याच्याविरोधात शस्त्र कायद्या अंतर्गत खटला सुरू आहे. तसेच लक्खा सिंह सिधाना अनेकदा तुरुंगातदेखील जाऊन आला आहे. मात्र अनेक प्रकरणांमध्ये त्याच्या विरोधात पुरावे न आढळल्याने किंवा साक्षीदार न सापडल्याने तो आतापर्यंत बाहेर आला. दरम्यान, मंगळवारी झालेल्या हिंसाचारानंतर गृह मंत्रालयाने दिल्लीच्या काही भागांत इंटरनेट सेवा बंद केली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी लक्खा सिधानाचेही नाव समोर

नवी दिल्ली – काल देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान उफाळलेल्या हिंसाचाराने संपूर्ण दिल्ली हादरली. या हिंसाचारात सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

ज्यांचे स्वत:चे दामन रक्ताने माखले आहेत त्यांनी दुसऱ्यावर आरोप करु नये – आशिष शेलार

नवी दिल्ली – काल देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान उफाळलेल्या हिंसाचाराने संपूर्ण दिल्ली हादरली. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दिल्ली हिंसाचारानंतर पंजाब-हरयाणात अलर्ट! मोबाईल सेवा बंद

नवी दिल्ली – दिल्लीत दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी गालबोट लागलं. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीने हिंसक वळण घेतलं आणि बघता बघता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

24 तासांत 12,689 नवे रुग्ण! देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,06,89,527 वर

नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटीच्या पार गेल्याने चिंता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपापली काळजी घेणे आवश्यक आहे. त्यातच देशात मागील...
Read More
post-image
महाराष्ट्र वाहतूक

अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान अपघात, एकाचा मृत्यू

अंबरनाथ – मध्य रेल्वे मार्गावरील अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकादरम्यान खडी टाकण्याचे काम करणारी मशीन रेल्वे रुळावरून घसरून अपघात झाला आहे. या अपघातात एका कर्मचाऱ्याचा...
Read More