‘दिल्लीचा पोपट काय म्हणतोय’; अंगणवाडी कर्मचार्‍यांचे धरणे आंदोलन – eNavakal
आंदोलन महाराष्ट्र

‘दिल्लीचा पोपट काय म्हणतोय’; अंगणवाडी कर्मचार्‍यांचे धरणे आंदोलन

सातारा – अंगणवाडी कर्मचारी संघटना (सीटू) च्यावतीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी वाढीव मानधनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. दिल्लीचा पोपट काय म्हणतोय, वेतन द्यायला न्हाय म्हणतोय.. वारे सरकार तेरा खेल सस्ता, पेट्रोल मेहंगा तेल … असल्या सरकारचे करायचे काय खाली मुंडी वर पाय’ अशा विविध घोषणांनी त्यांनी परिसर दणाणून सोडला.

सप्टेंबरमध्ये दिल्ली येथे झालेल्या मोर्चावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1 ऑक्टोबर 2018 पासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन वाढ लागू होईल असे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप एकही रुपया वेतनवाढ देण्यात आली नाही. वय वर्षे 60 असणार्‍या अंगणवाडी कर्मचार्‍याच्या तपासणीसाठी घेतलेले 415 रुपये परत करावे, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली असून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा आनंदी अवघडे, प्रतिभा भोसले, अनिता चव्हाण, मालन गुरव, उषा पाटील, वैशाली साळुंखे आदी पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला

मुंबई – मोदी सरकारकडून शुक्रवारी कंपनी करात करण्यात आलेल्या कपातीनंतर आज शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने जवळपास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

अनुष्का शर्माचा देशातील सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत समावेश

नवी दिल्ली – मिसेस कोहली अर्थात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला भारतातील सामर्थ्यशाली स्री म्हणून घोषित करण्यात आले आहे. फॉर्च्यून इंडियाने भारतातील ५० सामर्थ्यवान...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – द्रूतगतीवरची कासवगती

केंद्रीय वाणिज्य आणि रेल्वे मंत्री यांना मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला आणि त्यांनी मुंबईकर कसे संयमी आहेत, असा पलटवार करून वेळ मारून नेली. परंतु...
Read More
post-image
मुंबई

घाटकोपरमध्ये कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या

मुंबई – घाटकोपर येथे कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान घाटकोपर येथे मयांक ट्युटोरियल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अमित शहा २६ सप्टेंबरला पुन्हा मुंबईत

मुंबई – महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असणार असल्याची घोषणा करत भाजपा राष्ट्राध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी मुंबईतील गोरेगाव येथील सभेत विधानसभेच्या प्रचाराचा...
Read More