दिपक मानकर अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात – eNavakal
न्यायालय मुंबई

दिपक मानकर अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात

मुंबई – सामातिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येमुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिपक मानकर यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने आज असमर्थता दर्शविली. न्यायमूर्ती साधना जाधव यांनी असमर्थता दर्शविल्याने आता न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या समोर सुनावणी होण्याची दक्षता आहे. दोन आठवड्यापूर्वी सामाजीक कार्यकर्ते जितेद्र जगताप यांनी आत्महत्या करताना पाच जणांना जबाबदार धरले तशी चिठ्ठी ही लिहिली. याची दखल घेऊन पोलीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिपक मानकर यांच्यासह अन्य जणांवर गुन्हा दाखल केला त्या पैकी चार जणांना अटक केली. या प्रकरणी अटकेची शक्यता निर्माण झाल्याने दिपक मानकर याच्यावतीने अ‍ॅड. एम.एस. मोहिते यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर आज न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या समोर सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने या अर्जावर सुनावणी घेण्यास असमर्थता दर्शविली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

कुकडी नदीवरील बंधारा पाण्याअभावी कोरडाच

कवठे येमाई – शिरूर तालुक्यातील म्हसे बुद्रुक येथील कुकडी नदीवरील बंधारा अखेर पाण्याअभावी कोरडाच राहिला असून पाणी न आल्यास या प्रश्नी तीव्र आंदोलन करण्याचा कडक...
Read More
post-image
News देश निवडणूक

बिहारमध्ये महाआघाडीचे जागावाटप जाहीर

पाटणा – लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये आज महाआघाडीच्या जागावाटपाची घोषणा झाली. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, हिंदुस्थानी आवाम मोर्चा, राष्ट्रीय लोक समता पार्टी या पक्षांच्या महाआघाडीने...
Read More
post-image
News महाराष्ट्र

एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आक्रमक

रत्नागिरी – एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आता आक्रमक झाले आहेत. याच विषयासंदर्भात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात...
Read More
post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More