दिनविशेष : रामायणचे संगीतकार ‘रवींद्र जैन’ – eNavakal
दिनविशेष लेख

दिनविशेष : रामायणचे संगीतकार ‘रवींद्र जैन’

आज संगीतकार रवींद्र जैन यांची पुण्यतिथी. भावमधूर संगीताची कास कायम धरत भाषा कुठलीही असो, सहजी लोकांच्या ह्रदयाला भिडेल अशा संगीतातून त्या भावना पोहोचवणे ही संगीतकार रवींद्र जैन यांची खासियत होती. अभिनेता राज कपूर यांनी रवींद्र जैन यांना खूपच मदत केली. ‘राम तेरी गंगा मैली’, ‘दो जासूस’, ‘हिना’ अशा राज कपूरच्या चित्रपटांना जैन यांनी संगीत दिले. राजश्री प्रॉडक्शन आणि रवींद्र जैन यांचे एक समीकरण बनले होते. याशिवाय, सुजाता, सुखम सुखकरम, आकाशा थिंटे निरम अशा प्रादेशिक चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले.

हिंदी चित्रपटांमध्ये जम बसत असताना रवींद्र जैन यांनी एक वेगळा प्रयोग करत धार्मिक चित्रपट आणि मालिकांच्या गीतांना संगीत देण्यास सुरुवात केली. ‘वनरात्री’, ‘गोपाल कृष्ण’, ‘जय करोली माँ’, ‘हर हर गंगे’ अशा चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. रामायण, श्रीकृष्ण, साईबाबा, श्री ब्रह्मा विष्णू महेश, द्वारकाधीश, जय गंगा मैय्या, वीर योद्धा पृथ्वीराज चौहान अशा मालिकांना त्यांनी संगीत दिले आणि मालिकांची गीतेही बरीच गाजली. दाक्षिणात्य गायक येसुदासला हिंदी चित्रपटसृष्टीत ब्रेक देण्याचे संपूर्ण श्रेय रवींद्र जैन यांना जाते. ओ गोरिया रे, बीती हुअी रात की, गोरी तेरा गाव अशी रवींद्र जैन यांनी संगीत दिलेली गाणी येसूदास यांनी गायली. त्यांनी संगीत दिलेल्या गाण्यांमध्ये सचिन आणि रंजीतावर चित्रित झालेले ‘अखियों के झरोकोंसे..’ हे गाणे खूप लोकप्रिय ठरले. विरोधाभास एवढाच की दोन्ही डोळ्यांनी अंध असणाऱ्या या संगीतकाराने आपल्या संगीतामधून कधीच आपली वेदना जाणवू दिली नाही.

सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटांमधून रविंद्र जैन यांनी अनेक हळूवार भावगीतांमधून सुरांची पखरण केली. प्रत्येक संगीतकाराचा आपला एक आवडता गायक किंवा गायिका असते. जैन यांच्या संगीताचे नाते जोडले गेले ते गायक येसूदास यांच्याशी.. किंबहूना दक्षिणेकडच्या या गायकाला हिंदी चित्रपटांमध्ये आणणाऱ्या जैन यांचे त्यांच्याशी इतके घट्ट नाते होते की जर आपल्याला दृष्टी मिळालीच तर पहिले येसूदास यांचा चेहरा पहायला आवडेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.

रवींद्र जैन यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. बदलत्या काळानुसार त्यांनी आपल्या संगीतात बदल केला तरी त्यांनी संगीत दिलेल्या गाण्याची गोडी सुरेख होती. संगीतकार जैन यांनी फक्त चित्रपटांमधील गीतांना नव्हे तर प्रायव्हेट अल्बम, गझल, पौराणिक मालिकांनाही त्यांनी दिलेल्या संगीताला वेगळे महत्त्व होते. मा.रवींद्र जैन यांचे ‘दिल की नजर से’ हे शायरीवर आधारित पुस्तक प्रकाशित झाले आहे. शायरीवर पुस्तक लिहिणारे ते पहिले संगीतकार आहेत.मा.रवींद्र जैन यांचे ९ ऑक्टोबर २०१५ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.रवींद्र जैन यांना आदरांजली.

रवींद्र जैन यांची गाजलेली गाणी

  • आजसे पहेले आजसे जादा
    गोरी तेरा गाव बडा प्यारा
    जब दिप जले आना
    राम तेरी गंगा मैली
    सुन सायबा सुन

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई – कोचिवली एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गोव्याहून मुंबईला जाणारी ही एक्प्रेस इंजिन बिघाडामुळे रत्नागिरीजवळ पाऊण तास करबुडे बोगद्यामध्ये अडकली....
Read More
post-image
आरोग्य देश

बिहारमध्ये मेंदूज्वरामुळे १३२ जणांचा बळी

पाटणा – बिहारमध्ये मेंदूज्वर तापाचा कहर अद्यापही सुरुच असून यामुळे मृतांची संख्या १३२ वर पोहोचली आहे. तसेच इतर रुग्णालयांमध्ये उपचारांविना मृत्यू झालेल्या मुलांची आकडेवारीही अद्याप...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणीप्रश्नावरून विधानसभेत गदारोळ! १५ मिनिटे तहकूब

मुंबई – अधिवेशनाचा चौथ्या दिवशी आज विधानसभेत पाणीप्रश्नावरून प्रचंड गदारोळ झाला असून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई हवामान

दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन

मुंबई – राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी जनता मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होती. त्यामुळे जनतेला आता दिलासा मिळाला आहे. कारण मान्सून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : शिव VS पराग आणि नेहा

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्यात बरीच भांडणंं, वाद विवाद, आरोप–प्रत्यारोप सुरू आहेत. या टास्कमध्ये जिंकण्यासाठी बिग बॉस...
Read More