दिनविशेष : ‘प्रेम’च्या’ ‘भाभी’ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – eNavakal
दिनविशेष लेख

दिनविशेष : ‘प्रेम’च्या’ ‘भाभी’ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आज उत्तम निवेदिका, अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९६६ रोजी झाला. ‘सुरभी’ या दूरदर्शनवरील कार्यक्रमामुळे  रेणुका शहाणे हे नाव घराघरात पोहोचले. त्यांचे ते दिलखुलास हसून ‘नमस्कार’ म्हणणे आजही लोकांच्या कानांत आणि डोळ्यांसमोर आहे. या कार्यक्रमातून त्या एक उत्तम निवेदिका दिसल्या. त्यापाठोपाठ आलेल्या मालिकांमधून अभिनय निपुणताही प्रेक्षकांनी वाखाणली.

भारतीय दूरचित्रवाणीवर गाजलेल्या मालिकांपैकी अनेक रेणुका शहाणे यांच्या नावावर आहेत. सर्कस, सैलाब, इम्तिहान आदी मालिकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या. मुंबईतील मिठीबाई महाविद्यालयातून आर्ट्स या विषयात पदवी प्राप्त केलेल्या माननीय रेणुका शहाणे यांनी १९९२ मध्ये ‘हाच सुनबाईचा भाऊ’ या मराठी सिनेमाद्वारे आपल्या करिअरची सुरवात केली. मात्र त्यांना खरी प्रसिद्धी मिळवून दिली ती १९९३ ते २००१ या काळात दुरदर्शनवर प्रसारित झालेल्या ‘सुरभी’ या कार्यक्रमाने. सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे यांच्या सुत्रसंचलनाने बहरलेला हा कार्यक्रम खूप यशस्वी ठरला होता. त्यानंतर १९९४ मध्ये आलेल्या ‘हम आपके है कौन’ या सिनेमातील भूमिकेने रेणुकाच्या लोकप्रियतेत वाढ केली. या सिनेमानंतर मुलगी, बहीण, बायको, सून, वहिनी असावी तर ती अगदी रेणुकासारखीच असे प्रत्येकाला वाटू लागले.

हिंदी चित्रपटसृष्टीत ‘हम आप के है कौन’मुळे ‘भाभी’ म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘हम आपके है कौन’ नंतर रेणुका या फक्त महेश कोठारे दिग्दर्शित ‘मासूम’ या एकमेव हिंदी चित्रपटातून दिसल्या. रेणुका शहाणे या हिंदी चित्रपटातूनही, बराच काळ झाला तरी दिसल्या नाहीत, याबाबत त्या म्हणतात, ‘हम आपके है कोन’ चे दिग्दर्शक सुरज बडजात्या यांचे वडील राजकुमार बडजात्या यांनी मला त्यावेळी सांगितले की, या एकाच चित्रपटाने तुला अशी ओळख व लोकप्रियता मिळाली आहे, की तू यापुढे जास्त चित्रपटातून भूमिका साकारल्या नाहीस, तरी चालेल. १९९४ सालचा ‘हम आपके है कौन’ आजही झी सिनेमा वाहिनीवर सातत्याने दाखवला जात असून, तो आवर्जून पाहिला जातो. जोपर्यंत आपल्या देशात लग्नसंस्कृती कायम आहे, तोपर्यंत या चित्रपटाबाबतचे आकर्षण असेच कायम राहणार आहे. त्या लोकप्रिय प्रतिमेमध्ये न अडकता रेणुका शहाणे यांनी पुढील भूमिका सावधपणाने निवडल्या. नृत्य, खाद्यपदार्थ आणि विनोदाला वाहिलेल्या रिअॅमलिटी शोमधूनही त्या सहभागी झाल्या. आपली आई आणि प्रसिद्ध लेखिका शांता गोखले यांच्या कादंबरीवर आधारित ‘रिटा’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून रेणुका शहाणे यांच्यातील दिग्दर्शिकेशी ओळख झाली. रेणुका शहाणे यांनी अभिनेता आशुतोष राणा यांच्यासोबत लग्न केले आहे. रेणुकाजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

संजीव वेलणकर, पुणे
email – sanvelankar@gmail.com

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

मुलांच्या आरोग्याची विचारपूस करून डोस द्या! आरोग्य सेविकांना सूचना

मुंबई – पालिकेमार्फत घरोघरी जाऊन लहान मुलांना विविध औषधांचे डोस दिले जातात. या औषधांची अ‍ॅलर्जी मुलांना होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी औषधांचा डोस पाजणार्‍या...
Read More
post-image
News मुंबई

दादर येथे पाच एकर जमीन विक्रीची बतावणी करुन फसवणूक

मुंबई – रायगड येथील कर्जतमध्ये पाच एकर जमिन विक्रीची बतावणी करुन एका व्यक्तीकडून घेतलेल्या साडेसात लाख रुपयांची फसवणुकीप्रकरणी भामट्याविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे....
Read More
post-image
News मुंबई

सांताक्रुझमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर! पालिकेची डोळेझाक

मुंबई – राज्य सरकारने 23 जूनपासून प्लास्टीक पिशव्यांच्या वापरांवर बंदी लागू केल्यानंतरही सांताक्रुझ (पुर्व) भागातील फेरीवाले व काही दुकानदार प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर करताना...
Read More
post-image
News मुंबई

दहा दिवसांच्या मुलाला रिक्षात टाकून पलायन

मुंबई- कौटुंबिक वादातून दहा दिवसांच्या आपल्याच मुलाला रिक्षात टाकून पळून गेलेल्या माता-पित्याला काल वर्सोवा पोलिसांनी अटक केली. दुर्गा महेंद्र कामत आणि अंजूदेवी दुर्गा कामत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास मोदी जबाबदार! अशोक चव्हाण

सोलापूर- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास सुरक्षा यंत्रणा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच याचे राजकारण करणार नाही परंतु...
Read More