दिनविशेष : नाटककार अशोक पाटोळे यांची पुण्यतिथी – eNavakal
दिनविशेष लेख

दिनविशेष : नाटककार अशोक पाटोळे यांची पुण्यतिथी

५ जून, १९४८ रोजी ख्यातनाम नाटककार, लेखक मा.अशोक पाटोळे यांची पुण्यतिथी.  ‘आई रिटायर होतेय’, ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’, ‘जाऊ बाई जोरात’, ‘श्यामची मम्मी’, ‘एक चावट संध्याकाळ’ ही गाजलेली नाटकं, ‘हसरतें’, ‘श्रीमान श्रीमती’ या सुपरहिट मालिका आणि ‘चौकट राजा’, ‘झपाटलेला’ यासारखे सिनेमे आपल्या सिद्धहस्त लेखणीतून साकारणारे अशोक पाटोळे यांचे शालेय शिक्षण गिरगावातील विल्सन हायस्कूल येथे झाले. अशोक पाटोळे यांना लहानपणापासूनच लेखनाची आवड होती.

कथाकार, नाटककार म्हणून १९७१ मध्ये त्यांनी ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ ही पहिली एकांकिका लिहिली. त्यांनी लिहिलेली पहिली कथा ‘नवाकाळ’ या दैनिकात प्रकाशित झाली होती. पुढे ‘श्री दीपलक्ष्मी’, साप्ताहिक मार्मिक’ आदी नियतकालिकांमधून त्यांनी लिहिलेल्या विनोदी कथा प्रकाशित झाल्या होत्या. पाटोळे ह्यांनी दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचेही लेखन केले होते. लहानपणापासूनच लिखाणाची आवड असलेले पाटोळे यांनी पहिल्यांदा १९७१ मध्ये ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ या एकांकिकेचे लेखन केले होते. यानंतर त्यांनी विनोदी व ह्रदयस्पर्शी अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांचे लेखन करत नाट्यक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

पाटोळे यांनी लिहिलेली २० नाटके व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. ‘झोपा आता गुपचूप’ हे त्यांचे पहिले नाटक. ‘मुंबई पोर्ट ट्र्स्ट’च्या ‘एकटा जीव सदाशिव’ या नाटकात त्यांनी विनोदी नायकाची भूमिका केली होती. चित्रकला, वक्तृत्व, गीतगायन व अभिनय यांचीही पाटोळ्यांना आवड होती. अनुपम खेर यांच्या ’कुछ भी हो सकता है’ या आत्मकथनात्मक नाटकाचे लेखन अशोक पाटोळे यांनी केले होते. अशोक पाटोळे यांची अनेक नाटके हिंदी-गुजरातीतही यशस्वी ठरली आहेत. सातव्या मुलीची सातवी सातवी मुलगी हा कथासंग्रह व पाचोळ्या हा त्यांचा कविता संग्रहदेखील प्रसिद्ध झाला होता. अधांतर, हद्दपार, अध्यात न मध्यात, हसरतें यांसारख्या यशस्वी दूरदर्शन मालिकांचे लेखनही त्यांनी केले होते. मा.अशोक पाटोळे यांचे १२ मे २०१५ रोजी निधन झाले. आपल्या समूहातर्फे मा.अशोक पाटोळे यांना आदरांजली.

संजीव वेलणकर, पुणे
email – sanvelankar@gamil.com

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

दहा जिल्ह्यांतून प्रवास करून ते सहाजण पोहचले गावाला

वर्धा – भारतातील सर्व राज्य आणी जिल्ह्यांच्या सीमा बंद असूनही तब्बल दहा जिल्ह्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून सहा मजूर आपल्या गावी पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईत ५२६ कोरोनाग्रस्त, ३४ जणांचा मृत्यू

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये थैमान घ्यालणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतातही दहशत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशात सध्या 4,281 कोरोनाग्रस्त असून बळींचा आकडा...
Read More
post-image
महाराष्ट्र

सीईटी बरोबर विद्यापीठाच्या परीक्षा होणार – सामंत

मुंबई – राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठे आणि त्यांच्या अखत्यारीतील महाविद्यालयीन परीक्षेसह सीईटी परीक्षा होणारच आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती...
Read More
post-image
देश

तबलिगी जमातच्या संपर्कातील दीड हजार जणांना कोरोना संसर्ग

नवी दिल्ली – देशातील कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 4 हजार 67 इतकी झाली आहे. त्यात तबलिगी जमातच्या संपर्कात आलेल्या दीड हजार जणांचा समावेश आहे....
Read More
post-image
देश

सॅनिटायझरच्या उत्पादन वाढीसाठी उत्तर प्रदेशात 55 कंपन्यांना परवाने

लखनऊ – कोरोनाचे संक्रमण थोपवण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझरचे उत्पादन वाढावे यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 55 कंपन्यांना नवीन परवाने दिले आहेत. या कंपन्या रोज जवळपास 70...
Read More