दिनविशेष : देशाला पहिला ऑस्कर देणारी भानू  – eNavakal
लेख

दिनविशेष : देशाला पहिला ऑस्कर देणारी भानू 

देशाला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानू यांचा  जन्म- २८ एप्रिल १९२९ कोल्हापुर येथे झाला. मूळच्या महाराष्ट्रीय व मराठी असलेल्या भानुमती अण्णासाहेब राजोपाध्ये आणि सध्या भानू अथय्या या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध महिला वेशभूषाकार. कोल्हापूर येथे जन्मलेल्या भानू  यांना लहानपणापासूनच रेखाचित्र काढण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळे त्यांनी मुंबई येथील जे. जे. स्कूल ऑफ़ आर्ट्स मध्ये प्रवेश घेतला व गोल्ड मेडल घेऊन पदवी प्राप्त केली. हिंदी चित्रपटाचे गीतकार व कवी सत्येन्द्र अथय्या यांच्या बरोबर लग्न झाले व त्या भानुमती राजोपाध्येच्या भानू अथय्या झाल्या. त्यांना लहानपणापासूनच गांधीजींचे रेखाचित्र काढण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळेच त्यांना रिचर्ड अॅडटनबरो यांच्या ‘गांधी’ (१९८२) या आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी कॉश्चूम डिझाईन करण्याची संधी मिळाली.

देशाला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानू अथय्या यांचा ऑस्कर प्रवास थक्क करणारा आहे. भानू अथय्या या १९५१ पासून भारतीय चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी कामिनी कौशल या अभिनेत्रीसाठी पहिला कॉश्चूम डिझाइन केला होता. ‘श्री ४२०’ मधील अभिनेत्री नादिरा यांच्यासाठी ‘मुड़-मुड़ के ना देख…’ या गाण्यासाठी केलेला गाऊन ने नवीन ओळख दिली. अभिनेत्रा साधना यांच्या सलवार-कमीजचे डिजाईन हे भानु अथय्या यांचे असायचे.ज्याची जादू ७० च्या दशकात फॅशन म्हणून ओळखली गेली. भानु अथय्या या अश्या ड्रेस डिजाइनर आहेत की, ज्याचे कपडे त्या पात्रात च्या भूमिकेत जातात. भानु अथय्या यांनी १३० हून अधिक चित्रपटात गुरुदत्त, यश चोपड़ा, राज कपूर, आशुतोष गोवारिकर, कॉनरेड रूक्स आणि रिचर्ड एटेनबरो यांच्याबरोबर काम केले आहे. ‘सी.आई.डी.’, ‘प्यासा’, ‘चौदहवी का चाँद’, आणि ‘साहब बीबी और ग़ुलाम’, ‘रेशमा और शेरा’ या चित्रपटांनी भानु अथय्या यांना एक नवीन ओळख मिळाली. भानु अथय्या यांनी ‘गाइड’ मध्ये वहीदा रहमान, ‘ब्रह्मचारी’ मध्ये मुमताज’, सत्यम् शिवम् सुंदरम्’ या चित्रपटातील झीनत अमान हिचाही कॉश्चूम भानू यांनीच डिझाइन केला होता. गुलज़ार यांच्या ‘लेकिन’ या चित्रपटासाठी भानू अथय्या सर्वोच्च ड्रेस डिजाइनर अवार्ड मिळाले होते. भानु अथय्या यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटासाठी पण ड्रेस डिजाइन केले आहे. भानु अथय्या यांनी’ सीरियल्स व नाटकासाठी पण ड्रेस डिजाइन केले आहे. भानु अथय्या यांनी आपल्या जीवनावर ‘द आर्ट ऑफ़ कॉस्ट्यूम डिज़ाइन’ या नावाने एक पुस्तक पण लिहिले आहे.

संजीव वेलणकर, पुणे
email – sanvelankar@gamil.com

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज वर्षावर बैठक

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस नव्या रुग्णांची भर पडत आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५४ हजार ७५८ वर पोहोचली आहे. तर...
Read More
post-image
महाराष्ट्र

गर्दी हटेना! उथळसर विभाग आजपासून पूर्णतः बंद

ठाणे – गेल्या १२ दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये ७८ ने वाढ झाली आहे. महापालिका प्रशासनाने अद्ययावत कंटेनमेंट झोनची यादी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यात एसआरपीएफच्या आणखी १४ जवानांना कोरोना

पुणे – पुण्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) आणखी १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर ३३ जवानांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईत १००२, पुण्यात ३२७ नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५४,७५८ वर

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलं आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. मंगळवारी 2091 नवे रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 54 हजार 758 वर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More