दिनविशेष : ‘कन्नड कोकिळा’ अमीरबाई कर्नाटकी – eNavakal
दिनविशेष मनोरंजन

दिनविशेष : ‘कन्नड कोकिळा’ अमीरबाई कर्नाटकी

सुरुवातीच्या काळातील हिंदी चित्रपटाच्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि पार्श्वगायिका ‘कन्नड कोकिळा’ अमीरबाई कर्नाटकी यांचा आज स्मृतीदिन. त्यांचा जन्म १ जानेवारी १९०६ विजापूर जिल्ह्यातील बेलागी येथे झाला होता.

अमीरबाई यांचे घराणे संगीत आणि नाटकप्रेमी कलाकारांचे. त्या पंचवीस वर्षांच्या असताना त्यांनी एचएमव्ही कंपनीसाठी एक कव्वाली गायली. त्यामुळे त्यांचा कला क्षेत्रात प्रवेश सुलभ झाला. अमीरबाई यांचा चित्रपट क्षेत्रात प्रवेश झाला तो गोहरबाईंमुळे. अमीरबाई मूक चित्रपटापासून बोलपटापर्यंत सहजपणे काम करू लागल्या. त्या वेळेला कंपनी नाटक आणि हिंदुस्तानी संगीत क्षेत्रातील अनेक नट आणि गायक हेसुद्धा चित्रपटक्षेत्रात प्रवेश करत होते. अमीरबाई यांनी चित्रपटामध्ये पार्श्वगायन सुरू केले तेव्हा मुबारक बेगम, सुरय्या, जोहरा अम्बालावाली, नूरजहाँ, शमशाद बेगम, उमादेवी यांसारख्या प्रसिद्ध गायिका होत्या. लता मंगेशकर तेव्हा लहान होत्या. त्या सर्वांमध्ये अमीरबाई त्यांच्या अपूर्व आवाजामुळे वैशिष्ट्यपूर्ण होत्या. १९४०चे दशक त्यांचे यशस्वी दशक ठरले. त्या कीर्तीशिखरावर पोहोचल्या ते ‘किस्मत’ (१९४२) या चित्रपटामुळे. भारतीय चित्रपट इतिहासात त्याने जमवलेला गल्ला (एक कोटी) हा त्या वेळचा विक्रमच होता. तो विक्रम त्यानंतर आठ वर्षांनी आलेल्या ‘आवारा’ या चित्रपटाने मोडला. ‘दूर हटो जी दुनियावालो’, ‘घर घर में दिवाली’,‘धीरे धीरे आरे बादल’ ही त्या वेळची सुप्रसिद्ध गाणी होती. गायन त्यांचे खरोखरच अभिव्यक्तीचे रूप होते. अमीरबाई यांचे गायन वैशिष्ट्य पूर्ण होते. त्यामागे मजरूह सुलतानपुरी यांसारख्यांच्या रचना गाऊन प्राप्त केलेली साहित्यिक जाणीव, शास्त्रीय संगीताचे ज्ञान आणि तार स्वरामध्ये गाण्याचा रंगभूमीवरील सराव अशी अनेक कारणे होती. अमीरबाई यांनी मुख्यत्वे उल्हासपूर्ण गाणी गायली आहेत. लता मंगेशकरांबरोबर त्यांनी गायलेली गाणी (‘समाधी’) लोकप्रिय झाली होती. ‘शहनाझ’ (१९४२) चित्रपटासाठी स्वतः अमीरबाई यांनी संगीत दिले. अमीरबाईंनी मराठी, मारवाडी, गुजराती चित्रपटामध्ये गायन केले. लता मंगेशकर यांच्या पार्श्वगायनक्षेत्रातील प्रवेशानंतर अमीरबाई यांचे युग संपले. अमीरबाई कर्नाटकी यांचे ०३ मार्च १९६५ रोजी निधन झाले.

– संजीव वेलणकर
९४२२३०१७३३

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News देश

महिलेसोबत अश्लिल संभाषण कर्नाटकच्या मंत्र्याचा राजीनामा

बेगळुरू- महिलेसोबत अश्लील संभाषण करतानाची टेप प्रसिद्ध झाल्यापासून वादाच्या भोवर्‍यात सापडलेले कर्नाटक जलसंधारण मंत्री रमेश जरकिहोली यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणामुळे...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘कुणी किंमत देतं का किंमत’, मुनगंटीवारांच्या भाषणावर मुख्यमंत्र्यांची टीका

मुंबई – विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांवर घणाघाती टीका केली. ‘सुधीर मुनगंटीवार यांचं भाषण पाहून मला मी...
Read More
post-image
दिनविशेष मनोरंजन

दिनविशेष : ‘कन्नड कोकिळा’ अमीरबाई कर्नाटकी

सुरुवातीच्या काळातील हिंदी चित्रपटाच्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि पार्श्वगायिका ‘कन्नड कोकिळा’ अमीरबाई कर्नाटकी यांचा आज स्मृतीदिन. त्यांचा जन्म १ जानेवारी १९०६ विजापूर जिल्ह्यातील बेलागी येथे...
Read More
post-image
मनोरंजन

अनुराग कश्यप, तापसी पन्नूविरोधात आयकरची छापेमारी

मुंबई – बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसीच्या मुंबईतील मालमत्तांवर आयकर विभागाच्या पथकांनी छापे टाकत झाडाझडती सुरू केली आहे. अनुराग आणि तापसी...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू; कारण अस्पष्ट

भिवंडी – देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांना ही लस दिली जात आहे. याशिवाय ज्यांना अनेक आजारांनी ग्रासले आहे. अशा...
Read More