दिनविशेष : अभिनेते उत्पल दत्त यांना भावपूर्ण श्रद्धांजली – eNavakal
दिनविशेष लेख

दिनविशेष : अभिनेते उत्पल दत्त यांना भावपूर्ण श्रद्धांजली

आज हिंदी, बंगाली सिनेमातील अभिनेता, निर्देशक, लेखक, नाटककार मा. उत्पल दत्त यांची पुण्यतिथी. त्यांचा जन्म २९ मार्च १९२९ रोजी झाला. उत्पल दत्त हे उच्च दर्जाचे अभिनेता, दिग्दर्शक आणि नाटककार होते. त्यांनी केवळ बंगालीच नाही तर हिंदी चित्रपटांवरही आपली छाप टाकली. सीरियसपासून कॉमेडीपर्यंत त्यांनी प्रत्येक भूमिका अतिशय गंभीरपणे केली.

उत्पल दत्त यांचे शेक्सपियर साहित्यावर खूप प्रेम होते. १९४० मध्ये एका थिएटर कंपनीतून त्यांनी अभिनयास सुरुवात केली. थिएटर कंपनीतर्फे अनेक नाटके भारत आणि पाकिस्तानात आयोजित केली. १९५० पासून त्यांची बंगाली चित्रपट कारकीर्द सुरू झाली. अनेक बंगाली नाटके व चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. १९५० मध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माते मधू बोस यांनी चित्रपट माइकल मधुसुधन या चित्रपटात त्यांना मुख्य भूमिका दिली. उत्पल दत्त यांनी सत्यजित रे यांच्या चित्रपटांतसुद्धा अभिनय केला आहे. उत्पल दत्त हिंदी चित्रपट सृष्टीतील एक महान विनोदी अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक लघुपटातसुद्धा कामे केली आहेत. गुड्डी, गोल-माल, नरम-गरम, रंग बिरंगी व शौ‌कीन या चित्रपटात उत्पल दत्त यांनी कमाल केली आहे. त्यांची सर्वात गाजलेली विनोदी भूमिका गोलमालमधील होती त्यांना या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट हास्य अभिनेता फिल्मफेयर पुरस्कार मिळाला होता. १९६० साली चित्रपट अभिनेत्री शोभा सेन यांच्याशी उत्पल दत्त यांनी विवाह केला. उत्पल दत्त हे मार्क्सवादी नेतेसुद्धा होते. माननिय उत्पल दत्त यांचे १९ ऑगस्ट १९९३ रोजी निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

संजीव वेलणकर, पुणे
email – sanvelankar@gmail.com

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज अखेर दिवाळखोरीत

नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेज कंपनी अखेर दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्याबाबत एकाही...
Read More