दिनविशेष : अभिनेता सुनील दत्त – eNavakal
लेख

दिनविशेष : अभिनेता सुनील दत्त

आज सुप्रसिध्द अभिनेता सुनील दत्त यांची जयंती. त्यांचा जन्म ६ जून १९२९ रोजी झाला. सुनील दत्त यांचे खरे नाव बलराज रघुनाथ दत्त होते. सिनेसृष्टीत सुनील दत्त यांनी सिनेमाची निर्मिती, अभिनय, दिग्दर्शकसारख्या अनेक भूमिका साकारल्या. जवळपास चार दशकांपर्यंत त्यांनी लोकांचे भरपूर मनोरंजन केले. त्यांचे पात्र वास्तविक जीवनाच्या जवळचे असायचे. त्यांचे व्यक्तीमत्वसुध्दा तशाच पात्रांनी प्रभावित राहिले. फाळणीच्या दरम्यान त्यांचे कुटुंबिय भारतात आले होते. त्यांनी मुंबईच्या जय हिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि सोबतच नोकरीसुध्दा केली. सुनील यांनी रेडिओ सीलोनमध्ये हिंदी उद्घोषकच्या रुपात काम केले. त्यांनी ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’पासून फिल्मी करिअरला सुरूवात केली होती.

‘मदर इंडिया’ सिनेमाने त्यांच्या करिअरला एक नवीन वळण दिले आहे. सुनील दत्त भारतीय सिनेसृष्टीत अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत ज्यांच्या सिनेमाची पन्नास ते साठ दशकांमध्ये छाप प्रेक्षकांवर राहिलेली आहे. ‘मदर इंडिया’च्या यशानंतर ‘साधना’, ‘सुजाता’, ‘मुझे जीने दो’, ‘खानदान’, ‘पडोसन’सारख्या यशस्वी सिनेमांनी भारतीय प्रेक्षकांमध्ये एक यशस्वी अभिनेता म्हणून त्यांना ओळख निर्माण केली. सुनील दत्त आणि नर्गिस यांची प्रेमकथा एखाद्या फिल्मी लव्ह-स्टोरीप्रमाणे आहे. ‘मदर इंडिया’ सिनेमात सुनील दत्त यांनी नर्गिस यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. एक दिवशी शुटिंगदरम्यान त्यांच्या सेटवर आग लागली. सेटवर लागलेल्या आगीत नर्गिस अडकल्या. ते पाहून सुनील दत्त यांनी आपला जीव धोक्यात टाकून आगीत उडी मारली. या घटनेने सुनील आणि नर्गिस यांना जवळ आणले. त्यानंतर एकमेकांना भेटण्याचे सत्र सुरू झाले आणि दोघे लग्नगाठीत अडकले.

बी. आर. चोप्रासोबत ‘गुमराह’, ‘वक्त’, ‘हमराज’ सारख्या सिनेमांमध्ये साकारलेल्या भूमिका अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या आयुष्यातील ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा शेवटचा सिनेमा होता. या सिनेमात पहिल्यांदा त्यांनी मुलगा संजय दत्तसह काम केले होते. त्यापूर्वी ‘क्षत्रिय’ आणि ‘राकी’ सिनेमातसुध्दा दोघांनी एकत्र काम केले परंतु सिनेमातील एकाही दृश्यात ते एकत्र दिसले नाहीत. सुनील दत्त यांचे २५ मे २००५ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर, पुणे
email – sanvelankar@gamil.com

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
Uncategoriz देश

Corona : गंगा नदीच्या प्रदूषणात घट

पाटणा – लॉकडाऊनमुळे देशासह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक कारखाने आणि कंपन्या बंद आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या प्रदूषणात घट झाली असून पाटणा परिसरातील गंगा नदी...
Read More
post-image
देश

दिल्ली पोलीस दलातील अधिकाऱ्याला दारूची वाहतूक करताना अटक

नवी दिल्ली – देशात लॉकडाऊन काळात बेकायदेशीर दारूची वाहतूक करताना अनेकांना पकडण्यात आले आहे. मात्र आज दिल्ली पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अशा बेकायदा...
Read More
post-image
विदेश

कोरोनाची लस शोधणारच! बिल गेट्स यांचा निर्धार

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसवर परिणाम करणारी लस विकसित करण्यासाठी मिलिंडा व बिल फाउंडेशन पूर्ण निधी देणार आहे, अशी माहिती मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक आणि...
Read More
post-image
देश

जयपूरमध्ये अतिउत्साही नागरिकांनी फटाके वाजवले! बंगल्याला भीषण आग

जयपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना काल रात्री घरातील दिवे बंद करून मेणबत्त्या आणि पणत्या लावण्यास सांगितले होते. मात्र राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील वैशाली...
Read More
post-image
महाराष्ट्र

महाराष्ट्रासाठी कोरोना ठरतोय धोक्याची घंटा

मुंबई – राज्यात गेल्या 2 दिवसांत कोरोना संसर्गाच्या नवीन 113 रुग्णांची संख्या झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा 748 इतका झाला आहे. आतापर्यंत 56...
Read More