दिनविशेष : अभिनेता भारत भूषण – eNavakal
लेख

दिनविशेष : अभिनेता भारत भूषण

आज अभिनेता भारत भूषण यांची जयंती. त्यांचा जन्म. १४ जुन १९२० उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यात झाला. भारत भूषण यांना लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये काम करायची आवड होती. पण त्यांच्या वडिलांना ते पसंत नव्हते म्हणून मग त्यांना घर सोडावे लागले. चित्रपटांमध्ये काम करायच्या उद्देशाने भारत भूषण कलकत्याला निघून गेले. त्यावेळेला तेथे मोठमोठे चित्रपट बनत होते. तेथे त्यांना संघर्ष करावा लागला. एक दिवस त्यांच्या कष्टाचं चीज झाले व त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळायला लागले.

भारत भूषण चित्रलेखा या चित्रपटातून सहाय्यक अभिनेता म्हणून पडद्यावर आले. त्यांना सर्वात मोठा ब्रेक दिला तो म्हणजे केदारनाथ शर्मा यांनी सुहाग रात या चित्रपटामध्ये. या चित्रपटात भारत भूषण यांनी गीताबाली यांच्याबरोबर काम केले. हा चित्रपट हिट झाला. त्यांनतर १९५२ साली आलेला बैजूबावरा या चित्रपटाने त्यांना स्टार बनवलं. हा तो काळ होता जेव्हा भारत भूषण हे सगळ्या मोठ्या अभिनेत्री सोबत काम करत होते जसे मीनाकुमारी, वैजंतीमाला, गीताबाली सारख्यांबरोबर काम करत होते. आता ते चित्रपटांमध्ये अभिनयासोबत निर्माता म्हणूनही काम करू लागले.

भारत भूषण यांचे मुंबई व्यतिरिक्त इतर शहरांमध्येही अनेक बंगले होते. महागड्या आणि परदेशी गाड्या पण होत्या. ते निर्मिती क्षेत्रात उतरले परंतु त्यांना यश आले नाही. काही चुकीच्या निर्णयांमुळे भारत भूषण राजा पासून भिकारी बनत गेले. गाडी बंगला सगळं काही विकायची वेळ आली. भारत भूषण यांना खूप आर्थिक संकटांना सामोरे जावं लागलं. एक वेळ अशी पण आली कि त्यांना भाड्याच्या घरात राहावं लागलं. काही लोक म्हणत असत की हे सर्व त्यांच्या आणि मीनाकुमारीच्या प्रेमप्रकरणाचा परिणाम मानत होते. चित्रपटात मुख्य कलाकाराची भूमिका तर लांबच राहिली त्यांना छोटे मोठे रोल सुद्धा मिळेनासे झाले होते. त्यांची रोजची खायची सोया मोठ्या मुश्किलीने होत होती. असं म्हणतात कि ज्या स्टुडिओमध्ये गेल्यावर लोक न चुकता सलाम करायचे त्या स्टुडिओमध्ये भारत भूषण यांनी चौकीदाराची नोकरी देखील केली. याच गरिबीच्या परिस्थितीत भारत भूषण यांचे निधन २७ जानेवारी १९९२ रोजी झाले.

संजीव वेलणकर, पुणे
email – sanvelankar@gamil.com

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

रायपूर – नोव्हेंबर महिन्यात छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार असून दोन टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. यात...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडातील मुख्य अधिकार्‍यांना नवीन गाड्या मिळण्याची शक्यता

मुंबई- म्हाडातील नवनिर्वाचित अध्यक्ष व सभापती यांना इनोव्हा गाड्या देण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर म्हाडातील मुख्य अधिकारी यांना कार्यालयीन कामकाजासाठी नवीन गाड्या दिल्या जाणार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुंब्रा मदरसातून अपहरण झालेला तरुण सापडला

ठाणे- 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या नुरुल उलूम मदरसा येथून दोन अज्ञात इसमांनी अपहरण केलेला 18 वर्षीय तरुण हसन अहमद हा आज दुपारी कल्याण...
Read More
post-image
News देश

राजकीय पक्षांनी महिलांसाठी तक्रार समिती स्थापन करावी – मनेका गांधी

नवी दिल्ली -देशात चालत असलेल्या मीटू कँपेनच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री मनेका गांधींनी देशातील सर्व राजकीय पक्षांना महत्त्वाचे आवाहन केले. राजकीय पक्षांनी महिलांसाठी...
Read More
post-image
News देश

श्रीलंकेचे पंतप्रधान दिल्लीमध्ये दाखल! नरेंद्र मोदींची शनिवारी भेट घेणार

नवी दिल्ली -श्रीलंकेचे पंतप्रधान राणील विक्रमसिंघे आजपासून तीन दिवसांच्या भारत दौर्‍यावर आले आहेत. आज संध्याकाळी ते राजधानी दिल्लीमध्ये पोहचले. माध्यमांमध्ये आलेल्या वादग्रस्त विधानादरम्यान विक्रमसिंघे...
Read More