दिग्दर्शक निशिकांत कामत व्हेंटिलेटवर – eNavakal
मनोरंजन महाराष्ट्र

दिग्दर्शक निशिकांत कामत व्हेंटिलेटवर

हैदराबाद – दिग्दर्शक निशिकांत कामत यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. ते उपचारांनाही प्रतिसाद देत असल्याचे सांगण्यात येतंय. काही वेळापूर्वी त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती. मात्र, अभिनेता रितेश देशमुख याने ट्विट करून या अफवेला लगाम लावला. त्यानंतर रुग्णालयानेही मेडिकल बुलेटिन जारी केले.

मराठीतील लोकप्रिय चित्रपट डोंबिवली फास्ट या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. दृश्यम’, ‘फोर्स’, ‘मदारी’ अशा बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे निशिकांत यांना यकृताचा आजार झाला असून त्यांचं हे दुखणं पुन्हा एकदा बळावल्यामुळे त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु आहे. याच काळात त्यांचं निधन झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली होती. परंतु, ही अफवा असल्याचं स्पष्ट होत आहे. तसंच अभिनेता रितेश देशमुख, रेणुका शहाणे या कलाकारांनीदेखील ही अफवा असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे.

 

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन महाराष्ट्र

दिग्दर्शक निशिकांत कामत व्हेंटिलेटवर

हैदराबाद – दिग्दर्शक निशिकांत कामत यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. ते उपचारांनाही प्रतिसाद देत असल्याचे सांगण्यात येतंय. काही वेळापूर्वी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मॉल्स उघडली जातात मग मंदिरं का नाही? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

मुंबई – राज्यातील मॉल्स उघडू शकतात तर मग मंदिरं का नाही, असा खडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

दिल्लीत गणपती आणि मोहरमच्या मिरवणुकांवर कोरोनामुळे बंदी

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत यावेळी दिल्लीत मोहरमच्या मिरवणुका आणि गणेश आगमन मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे....
Read More
post-image
देश

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अद्यापही व्हेटिंलेटरवरच

नवी दिल्ली – भारताचे माजी राष्ट्रपती यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना अद्यापही व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर दिल्लीतल्या आर्मी हॉस्पीटलमध्ये...
Read More
post-image
देश विदेश

राजकीय पक्ष आणि राजकारण न पाहता आम्ही काम करतो, फेसबुकचं स्पष्टीकरण

न्यूयॉर्क – भारतात फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर भारतीय जनता पक्षाचं नियंत्रण आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. द वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये छापून आलेल्या...
Read More