दिगंबर कामत भाजपाचे गोव्याचे मुख्यमंत्री? भाजपाचा काँग्रेसला मात देण्याचा प्रयत्न – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

दिगंबर कामत भाजपाचे गोव्याचे मुख्यमंत्री? भाजपाचा काँग्रेसला मात देण्याचा प्रयत्न

पणजी – गोव्याचे भाजपाचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्यामुळे त्यांच्या जीवनाची शाश्वती कमी असल्यामुळे काँग्रेसने गोव्यामध्ये सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेसच्या राजकारणाला शह देण्यासाठी भाजपाने नामी युक्ती शोधून काढली आहे. काँग्रेसचे नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनाच भाजपात घेऊन त्यांना भाजपाचे गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्याचा घाट भाजपाने घातला आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर दिगंबर कामत हे आजच दिल्लीला रवाना झाले आहेत.

काल मनोहर पर्रिकर यांची तब्येत फारच खालावली त्यांना बोलताही येत नव्हते. त्यामुळे त्यांच्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर केंद्रातील मोदी सरकार गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करेल, या भीतीने काँग्रेसने काल राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे सत्ता स्थापन करण्याचा दावा पेश केला. त्यानंतर भाजपा आमदारांची अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. गोवा विधानसभा अध्यक्ष मायकल लोबो हे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी दिगंबर कामत यांना भाजपात घेऊन मुख्यमंत्री बनविण्याबाबत आमदारांशी चर्चा केली. त्यानंतर केंद्रातील भाजपा श्रेष्ठींना याबाबत कळविण्यात आले. त्यानंतर आज काँग्रेस नेते दिगंबर कामत हे भाजपा नेत्यांना भेटण्यासाठी घाईघाईने दिल्लीला गेले.

भाजपाने टाकलेल्या राजकीय डावांमुळे काँग्रेस बॅकफुटवर गेली आहे. गोव्यामध्ये काँग्रेसकडे 17 आमदार आहेत. तर भाजपाचे फक्त 13 आमदार आहेत. तरीही 3 अपक्ष, 3 महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीचे आमदार व 3 गोवा फॉरवॅर्ड पार्टीचे आमदार आणि 1 राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार यांच्या पाठिंब्याने भाजपाने गोव्यामध्ये सत्ता स्थापन केली होती. हे सरकार टीकविण्याचे काम फक्त पर्रिकरच करू शकत होते. मात्र त्यांची तब्येत खालावल्यामुळे आता दिगंबर कामत यांना भाजपात घेऊन त्यांना मुख्यमंत्री बनविण्यात येणार आहे. दिगंबर कामत हेच अपक्ष व इतर पक्षांचे आमदार भाजपासोबत ठेवू शकतील, असे भाजपा श्रेष्ठींना वाटते. कामत हे मुळचे भाजपाचेच होते. 2005 साली भाजपा सोडून ते काँग्रेसमध्ये गेले व मुख्यमंत्री झाले होते. आता ते पुन्हा स्वगृही परत येत आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा

मुंबई- घाटकोपरमध्ये विषारी रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा झाल्याची घटना घडली. या सर्वांना महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विषारी रासायनिक रंगाचा...
Read More
post-image
News अपघात मुंबई

गोरेगावमध्ये कारच्या धडकेत 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई – गोरेगाव येथे एका कारच्या धडकेने अरहान रमजान खान या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका चार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू

दिंडोरी – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मादी आणि एका नर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईच्या कळंब समुद्रात 5 जणांना जलसमाधी

वसई – वसई तालुक्याच्या कळंब समुद्रकिनारीवर होळी- रंगपंचमी साजरी करण्यासाठी आलेल्या पाच जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली. एकाचा मृतदेह...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बांदिवडेकरांची उमेदवारी वादाच्या भोवर्‍यात

रत्नागिरी – ररत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार्‍या नविनचंद्र बांदिवडेकर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी असलेल्या वैभव राऊतला...
Read More