दाभोलकर, पानसरे हत्याप्रकरण! तपास यंत्रणा आरोपत्र दाखल करणार – eNavakal
News न्यायालय

दाभोलकर, पानसरे हत्याप्रकरण! तपास यंत्रणा आरोपत्र दाखल करणार

मुंबई- कॉम्रेड गोविंद पानसरे आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास करण्यास अपयशी ठरलेल्या तपास यंत्रणांनी अखेर आरोपींविरोधात आठवड्याभरात पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाईल, अशी ग्वाही आज उच्च न्यायालयात दिली. एसआयटी कोल्हापुरात 12 फेब्रुवारीला तर सीबीआय पुण्यात 13 फेब्रुवारीला हे पुरवणी आरोपपत्र दाखल करेल अशी माहिती सीबीआय आणि एसआयटीने न्यायालयात दिली. याची न्यायमूर्ती एस.सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने दखल घेतली. पुरवणी आरोपत्र दाखल झाले म्हणून तपास थांबवू नका फरार आरोपींचा शोध सुरूच ठेवा असे निर्देश देत याचिकांची सुनावणी 14 मार्चपर्यंत तहकूब ठेवली.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यामध्ये ऑगस्ट 2013 मध्ये तर कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापूरात अज्ञात मारेकर्‍यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्याकांडांची स्वतंत्र यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणार्‍या विविध याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत़ या याचिकांवर आज न्यायमूर्ती एस.सी धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती एम.एस.कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी दोन्ही तपास यंत्रणांनी आपल्या तपासाचा सीलबंद प्रगती अहवाल हायकोर्टात सादर केला. तसेच प्रकरणात पुढील आठवड्यात एसआयटी कोल्हापुरात 12 फेब्रुवारीला तर सीबीआय पुण्यात 13 फेब्रुवारीला पुरवणी आरोपपत्र दाखल करेल अशी माहिती विशेष तपास यंत्रणा आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग या दोन्ही तपासयंत्रणांच्यावतीने देण्यात आली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

नोएडातील रस्त्यांवर निमलष्करी दल तैनात

नोएडा – सर्व जिल्ह्यांच्या आणि राज्यांच्या सीमा बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून करण्यात आल्यानंतर उत्तर प्रदेशचे गौतम बुद्ध नगर जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या....
Read More
post-image
अर्थ विदेश

येत्या काही दिवसांत वर्जिन अटलांटिक मागणार सरकारकडे मदत

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने जगभरातील सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानसेवाही या विषाणूमुळे देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. म्हणूनच ब्रिटनची वर्जिन अटलांटिक...
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

ऐका, शरद पवारांचा लाईव्ह संवाद

मुंबई – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात आणि राज्यात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देश लॉकडाउन करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

यवतमाळमध्ये वीज अंगावर पडून एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

यवतमाळ – देशावर कोरोना व्हायरसचे संकट असतानाच राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यातच यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात कोरोना संशयिताचा मृत्यू? अहवालाची प्रतीक्षा

कोल्हापूर – राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच आज कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे...
Read More