दादा कोंडके…डबलमिनिंगचा ‘दादा’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या दिनविशेष मनोरंजन लेख

दादा कोंडके…डबलमिनिंगचा ‘दादा’

70-80 दशकात जेव्हा हिंदी सिनेमात देव आनंद, दिलीप कुमार, राज कपूर या हॅण्डसम हंकचा दबदबा होता, तेव्हा एका सोंगाड्याने आपल्या विनोदी शैलीने महाराष्ट्रातली चित्रपटगृह दणाणून सोडली आणि मरगळलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला नवी उभारी दिली ती दादा कोंडके या अवलियाने. विषय कोणताही असो, तो आपल्याला हवा तसाच वळवायचा आणि बिनदिक्कतपणे समोरच्याला पटवूनही द्यायचा ही त्यांची खास हातोटी. ‘आये’ हा शब्द तर जणू दादांचा कॉपीराईटच. मराठी मातीची नस दादांना अचूक सापडली होती म्हणूनच त्यांचे सर्वच चित्रपट सुपरहीट ठरले.

खंडेराव कोंडकेंच्या घरी ८ ऑगस्टला जन्माला आलेल्या दादा कोंडकेंची प्रसिद्धी जन्मापासूनच तुफान होती. ऑगस्ट 1932 ला गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर जन्म झाला म्हणून त्यांचे नाव कृष्णा ठेवलं. पण हा कृष्णा जन्माला आल्यानंतर राहणार का जाणार अशा अवस्थेत होता. त्यामुळे कोणीतरी दादांच्या कुटुंबियांना त्यांचे नाव बदलण्यास सांगितले आणि त्यानंतर कृष्णाचे ‘दादासाहेब’ असे नामकरण झाले.

‘सोंगाड्या’ ही दादांची पहिली निर्मिती. तब्बल 5 आठवडे पुण्यात आणि 37 आठवडे मुंबईत चालणाऱ्या या सिनेमाला न भूतो न भविष्यती यश मिळालं.  हा चित्रपट त्यांच्या जीवनातील मैलाचा दगड ठरला. दादांनी मराठीत एकूण १६ चित्रपटांची निर्मिती केली. ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाटय़ापासून सुरू झालेला ‘त्यांचा’ प्रवास चित्रपटसृष्टीकडे वळला आणि सलग नऊ रौप्यमहोत्सवी चित्रपट देऊन अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि इतरही भूमिकांमध्ये वावरलेल्या दादा कोंडके यांनी आगळा विक्रम घडविला. या विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले.

१९७५ मध्ये दादा कोंडके यांच्या पांडू हवलदार या चित्रपटाची बरीच चर्चा झाली. यामध्ये त्यांनी पांडू नावाची व्यक्तिरेखा रंगवली. दादा एकदा शिकारीला गेले असताना, जोरदार पाऊस पडला. पाऊस थांबल्यावर झाडातून गळणारं पाणी पाहून दादांना वर ‘ढगाला लागली कळं’ सुपहिट गाणं सुचलं.  दादांचं सेन्सॉर बोर्डाशी तर सात जन्माचं वैरच जणू. दादांचे चित्रपट आणि सेन्सॉर बोर्डाची कात्री हे जणू त्याकाळचं ठरलेलं समीकरण. पण दादांच्या युक्तीवादापुढे सेन्सॉर बोर्डाची कात्री कायमच बोथट व्हायची. दादा कोंडके हे प्रखर राजकीय वक्ता होते. महाराष्ट्रात शिवसेनेचा प्रचार करणारे दादा कोंडके अनेकांच्या स्मरणात असतील.

प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करणाऱ्या, खळखळून हसवाणाऱ्या दादांची कौटुंबिक सुखाची विच्छा मात्र कधीच पुरी झाली नाही. त्यांचं खासगी आयुष्य नेहमीच  वादग्रस्त राहिलं. अखेर 14 मार्च 1998 रोजी त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने या ‘सोंगाड्या’ने नकोशी एक्झिट घेतली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

जनशताब्दीला सावंतवाडीत थांबा

सावंतवाडी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईहून गोव्याला जाणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसला आता सावंतवाडी स्थानकात थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाकडून...
Read More
post-image
News देश

‘पारले’ बिस्कीटला मंदीचा फटका! हजारो कर्मचार्‍यांवर बेकारीचे संकट

नवी दिल्ली – बिस्कीटांचे उत्पादन घेणार्‍या देशातील सर्वात मोठ्या पारले कंपनीलाही मंदीचा फटका बसला आहे. तसेच मागणी घटल्याने कंपनीने उत्पादनात कपात केली आहे. त्यामुळे...
Read More
post-image
News देश

प्रियांका चोप्राला यूएनच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरून हटवा

नवी दिल्ली- पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! १६ तासांपासून फरार

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लॉंडरिंग प्रकरणात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृह व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा...
Read More