दादर, वसई रोड स्थानकातील पादचारी पूल आजपासून ‘बंद’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

दादर, वसई रोड स्थानकातील पादचारी पूल आजपासून ‘बंद’

मुंबई – पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर आणि वसई रोड रेल्वे स्थानकातील पादचारी पूल दुरुस्तीसाठी आजपासून बंद करण्यात येणार आहेत. दादर स्थानकातील चर्चगेट दिशेकडील पादचारी पूल तर वसई रोड स्थानकावरील फलाट क्रमांक 6 आणि 7 वरील मध्यवर्ती पूल सुरक्षेच्या कारणास्तव 29 मे पर्यंत बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी या दरम्यान पर्यायी पादचारी पुलाचा वापर करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, सीएसएमटी स्थानकाजवळील हिमालय पूल दुर्घटना झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने पुलाची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्यास जलद गतीने सुरुवात केली आहे. यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील एकूण ४२ नवीन पादचारी पूल, पुलांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी १०० कोटी ८७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा समाजाच्या आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

करण जोहर ठरला सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चित्रपट निर्माता

मुंबई – चित्रपट निर्माता करण जोहर बॉलिवूडच्या लोकप्रिय चित्रपट निर्मात्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाने गेल्या सहा महिन्यातील बॉलिवूडच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट निर्मात्यांची नुकतीच एक...
Read More