दादर मंडईत पायाने गाजर धुवणाऱ्या विक्रेत्यांवर पालिकेची कारवाई – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दादर मंडईत पायाने गाजर धुवणाऱ्या विक्रेत्यांवर पालिकेची कारवाई

मुंबई – रेल्वे स्थानकावर, हॉटेलमध्ये आणि बाजारपेठेत विकले जाणारे खाद्यपदार्थ अस्वच्छ ठिकाणी बनवले जातात किंवा अस्वच्छ पद्धतीने बनवले जातात, अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या आहेत. त्यातच अलीकडे ईदच्या दिवशी दादर येथील पालिकेच्या मंडईत गाजर विक्रेते पायाने गाजर धुवत असल्याचा किळसवाणा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पालिकेच्या बाजार विभागाने याची गंभीर दखल घेतली असून विक्रेत्यांकडून २० ड्रम जप्त करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी अकरा गाळेधारकांना नोटीस बजावून प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

दादर येथील पालिकेच्या क्रांतीसिंह पाटील मंडईमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक व्यक्ती ड्रममध्ये गाजर धुवताना दिसत आहे. त्याला द कोणीतरी गाजर हाताने धुण्यास सांगत आहे. त्यावर आपण किती गाजर हाताने धुवायची. तुम्ही माती लागलेले गाजर खाणार का? असा उलट प्रश्न गाजर धुवणाऱ्याने विचारल्याचे व्हिडीओत दिसत आहे. याप्रकरणी पालिकेच्या बाजार विभागाने गाळा क्रमांक ८९, ८७, ८१, ८३ यांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी कुर्ला रेल्वे स्थानकात एक सरबत विक्रेता सरबतमध्ये हात धूवत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन पूर्ण शिथिल होणार नाही

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्चला देशात 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे लॉकडाऊन संपायला ७ दिवसांचा कालावधी...
Read More
post-image
महाराष्ट्र

मीरा-भाईंदरमध्ये लॉकडाऊनचा फज्जा, चौपाटीवर नागरिकांची गर्दी

भाईंदर – ‘जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास खुली राहतील, गर्दी करू नका’, अशा सूचना राज्य सरकारकडून वारंवार करण्यात येत आहेत. तरीही अनेक ठिकाणी भाजीपाला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, ‘भारताने मदत केली तर ठीक, अन्यथा…’

न्यूयॉर्क – बलाढ्य अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुन्हा एकदा मदतीची...
Read More
post-image
महाराष्ट्र

भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझेशन टनेल! एपीएमसीचा निर्णय

नवी मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एपीएमसी मार्केट निर्जंतुक करण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटच्या प्रवेशद्वारावर आजपासून सॅनिटायझेशन टनेल बसविण्यात आले आहे,...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण-डोंबिवलीतील अत्यावश्यक सेवेतील दुकाने ५ वाजल्यानंतर बंद

कल्याण – कल्याण-डोंबिवली शहरातील मेडिकल आणि दवाखाने वगळता अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने आज मंगळवारपासून सकाळी ५ ते सायंकाळी ५ यावेळेतच सुरू राहणार आहेत. सायंकाळी...
Read More