दादरमधील ‘त्या’ रोडवरील सर्व झाडांची खोड ठेवतच छाटणी – eNavakal
News मुंबई

दादरमधील ‘त्या’ रोडवरील सर्व झाडांची खोड ठेवतच छाटणी

मुंबई – दादर पश्चिम येथील मारुती रोडवरील सीकेपी हॉल आणि हिरण्य इमारतीसमोरील झाड उन्मळून चार जण जखमी झाले. परंतु दादरमधील या भागातील झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा महापालिकेच्यावतीनं केला गेला तर याला स्थानिकांकडून तीव्र विरोध केला गेला. स्थानिकांकडून होणार्‍या विरोधामुळेच या भागातील झाडांची छाटणी योग्यप्रकारे होऊ शकलेली नसल्याची बाब समोर आली. मात्र, या घटनेनंतर मारुती रोडवरील सर्व झाडांची छाटणी करून त्यांचं केवळ खोडच ठेवण्यात आलं आहे.
शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारा मोठा पाऊस आल्यामुळे या झाडाच्या आडोसाला उभ्या राहिलेल्यांच्या अंगावर हे झाड कोसळलं. त्यानंतर रविवारी या रोडवर असलेल्या सर्वच झाडांची छाटणी ट्री कटिंग मशिनद्वारे करण्यात आली आहे. यामध्ये या झाडांची खोड ही पाने दिसेपर्यंत ठेवून उर्वरीत वरील भाग कापून टाकण्यात आला आहे. झाडांच्या फांद्यांची छाटणी ही यापूर्वीही करण्याचा वारंवार प्रयत्न होत होता. परंतु महापालिकेचे कर्मचारी या झाडांच्या फांद्या छाटण्यास गेल्यास येथील स्थानिकांकडून विरोध व्हायचा,असे त्यांनी म्हटलं आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र राजकीय

बीडमध्ये काकांच्या कारभारावर पुतण्याचा बॅनरबाजीतून निशाणा

बीड- बीडच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच काका-पुतणे आमने-सामने उभे राहणार असल्याने त्यांच्यातील संघर्ष गल्लीबोळातही दिसू लागला आहे. राज्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विकासकामांवर त्यांचे पुतणे संदीप...
Read More
post-image
News देश राजकीय

काँग्रेससोबत युती नको, स्वतंत्र लढणार – देवेगौडा

बंगळुरू- कर्नाटकामध्ये मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहू, असे माजी पंतप्रधान आणि जनता...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा पूर्ववत

उरण- उरण ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे गेल्या 10 दिवसांपासून बंद असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा कालपासून पूर्ववत सुरू झाला आहे. यामुळे एका...
Read More
post-image
News महाराष्ट्र वाहतूक

बोरोटी रेल्वे यार्डमध्ये ब्लॉक! कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रद्द

सोलापूर- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर वाडी सेक्शनच्या बोरोटी रेल्वे स्थानक यार्डमध्ये उद्या बुधवारी ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवासी गाड्यांमध्ये...
Read More
post-image
News महाराष्ट्र राजकीय

इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा! बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर- संगमनेरयेथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज दिसल्यानंतर ते बाळासाहेबांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त...
Read More