दादरच्या फुल मार्केटमध्ये गोळीबार; एकाचा मृत्यू – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

दादरच्या फुल मार्केटमध्ये गोळीबार; एकाचा मृत्यू

मुंबई – मुंबईतील दादरच्या फुल मार्केटमध्ये गोळीबाराची घटना घडली. आज सकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात आरोपीने गोळी झाडून मनोज मौर्या या इसमाची हत्या केली. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपी गोळीबार करून फरार झाला आहे. गोळीबारात मारला गेलेला मौर्य हा फूल मार्केटमध्ये वजन काटे पुरविण्याचे काम करायचा अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. त्याच्यावर हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला आणि का झाला याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सीसीटीव्हीचा फुटेज पाहून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. मात्र, या घटनेनंतर मार्केटमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#IPLAuction2019 आयपीएलच्या लिलावास सुरुवात

जयपूर – पुढील वर्षी सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या(आयपीएल) लिलावास सुरुवात झाली आहे. जयपूर येथील हा लिलाव पार पडत आहे. पुढील वर्षी मार्च महिन्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

(अपडेट) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणास मराठीतून सुरुवात

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते कल्याणमध्ये दाखल झाले असून त्यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले आहे. ३३...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय कर्मचार्‍यांचे 27 डिसेंबरला उपोषण

मुंबई – मुंबईतील वाचन संस्कृती वाढावी म्हणून मेहनत करणार्‍या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कर्मचार्‍यांना गेल्या अनेक वर्षांत वेतनवाढ व बढती मिळालेली नाही. तीन वेळा आंदोलन करूनही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज ठाकरेंना इगतपुरी कोर्टात जामीन मंजूर

इगतपुरी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना इगतपुरी कोर्टात जामीन मंजूर करण्यात आले आहे. २००८ साली परप्रांतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

शेतकरी कर्जमाफी होईपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी

नवी दिल्ली – गेल्या साडेचार वर्षात पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची १ रुपयाही कर्जमाफी केली नाही, असे म्हणत ‘मोदी सरकार जोपर्यंत देशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही नरेंद्र...
Read More