दादरचे चित्रा थिएटर आजपासून बंद – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

दादरचे चित्रा थिएटर आजपासून बंद

मुंबई – मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नसल्याची निर्माते आणि प्रेक्षकांची ओरड असताना दादरचे प्रसिद्ध चित्रा थिएटर आजपासून बंद करण्यात येणार आहे. गुरुवारी रात्री टायगर श्रॉफचा ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटाचा शेवटचा खेळ पार पडला. गेल्या 36 वर्षांपासून विविध चित्रपट पडद्यावर दाखवून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे चित्रा चित्रपटगृह बंद होणार असल्याने चित्रपट रसिकांमध्ये नाराजीचा सुर आहे. या चित्रपटगृहातील आठवणींना चित्रप्रेमींनी उजाळा दिला आहे. 550 आसने असलेले हे चित्रपटगृह आहे. या सिनेमागृहाची धुरा पी.डी मेहता यांच्या मुलाने दारा मेहता यांनी सांभाळली होती. मात्र प्रेक्षकांचा अल्पप्रतिसाद आणि आर्थिक चणचण जाणवत असल्यामुळे हे चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

1961 साली प्रदर्शित झालेला शम्मी कपूर ‘जंगली’ हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाने या सिनेमागृहाचे तब्बल 25 आठवडे गाजविले होते. त्याकाळी या चित्रपटगृहाकडे मराठी प्रेक्षक वर्गाचा ओघ जास्त होता. मात्र कालांतराने या चित्रपटगृहाला प्रेक्षकांचा अल्पप्रतिसाद मिळू लागला आणि आर्थिक चणचणही जाणवू लागली याच कारणास्तव हे चित्रपटगृह बंद करण्यात येणार असल्याचे दारा मेहता यांनी सांगितले.1983 साली प्रदर्शित झालेला अभिनेता जॅकी श्रॉफचा ‘हिरो’ हा चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला होता. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी या सिनेमागृहात या चित्रपटाचे हाऊसफुल शो सुरु होते. विशेष म्हणजे जॅकी श्रॉफचा सिनेमा ज्या सिनेमागृहात सुपरहिट ठरला, त्याच जॅकी श्रॉफच्या मुलाचा म्हणजेच टायगर श्रॉफच्या सिनेमाचा आज शेवटचा शो येथे होणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

भारताच्या अभिजीत बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

नवी दिल्ली – भारतीय शास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. गरिबी हटाव या योजनेसाठी प्रयत्न करणार्‍या अभिजीत बॅनर्जीं यांना...
Read More
post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More