दाऊदचं हॉटेल पाडून शौचालय बांधणार – eNavakal
गुन्हे देश

दाऊदचं हॉटेल पाडून शौचालय बांधणार

मुंबई : दहशतवादी दाऊद इब्राहिच्या मुंबईतील संपतील लिलाव येत्या 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी या लिलावात सहभागी होऊन दाऊदच्या अफरोज हॉटेलवर ते बोली लावणार आहेत. जर स्वामी चक्रपाणी यांना अफरोज हॉटेल विकत घेण्यात यश आलं तर ते हॉटेलच्या जागी भव्य शौचालय बांधणार आहेत. स्वत: स्वामी चक्रपाणी यांनी ही माहिती दिली आहे.

या हॉटेलची किंमत 1 कोटी 15 लाख रुपये आहे. मागे देखील दाऊदच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला होता. यावेळी चक्रपाणी यांनी दाऊदची कार विकत घेतली होती आणि नंतर दहशतवादाचं प्रतिक सांगून गाजियाबादमध्ये ही चारचाकी पेटवून दिली होती. येत्या 14 नोव्हेंबर रोजी पाकमोडिया स्ट्रीटवरील दाऊदच्या संपत्तीचा लिलाव केला जाणार आहे.

सीबीआयनं आतापर्यंत दाऊदच्या मुंबई आणि मुंबईबाहेरील अशा एकूण 10 प्रापर्टी जप्त केल्या आहेत. ज्यामधील 3 गोष्टींचा लिलाव होणार आहे. याकूब रस्त्यावरील शबनम गेस्ट हाऊस, पाकमोडिया रस्त्यावरील डांबरवाला इमारतीतील 5 घरं आणि हॉटेल रौनक अफरोज यांचा समावेश आहे. या हॉटेलची मूळ किंमत 1 कोटी 15 लाख ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता या लिलावात चक्रपाणी हे हॉटेल मिळवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

महिला स्पेशल लोकलसाठी बदलापुरात सेनेची स्वाक्षरी मोहीम

बदलापूर – बदलापूर येथून छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी गर्दीच्या वेळी महिला स्पेशल लोकल सोडण्याच्या मागणीसाठी बदलापूर येथे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज...
Read More
post-image
क्रीडा देश

भारतीय खेळाडूंना पत्नी, प्रेयसीपासून दूर राहण्याचे आदेश

लंडन – टी-20 आणि वन डे मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना संघ व्यवस्थापनाने एक महत्वाचा आदेश दिला आहे. इंग्लंडविरूद्धचे पहिले तीन सामने होईपर्यंत भारतीय खेळाडूंना...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : उंचे लोग उंची पसंद

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी संपर्क अभियान सुरू केले आहे. म्हणजे समाजातल्या मोठ्याकिंवा प्रतिष्ठित लोकांच्या भेटीगाठी घेण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. प्रत्येक राज्यात जाऊन...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडात चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमध्ये 4 लाखांची लूट

नांदेड – आज पहाटे 4.50 वाजता चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमधून चोरट्यांनी 4 लाख 24 हजारांचा ऐवज असलेली एक बॅग चोरून नेली आहे. चैन्नई ते नगरसोल जाणारी...
Read More
post-image
महाराष्ट्र

धुळ्यात सेनेचे दोन महानगरप्रमुख तुरुंगात; महालेंना दिला डच्चू

धुळे – शिवसेनेतर्फे धुळ्यासाठी दोन महानगरप्रमुख पदांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरप्रमुख असलेले सतिश महाले भूसंपादन मोबदला हडपल्याप्रकरणी अमळनेरमध्ये दाखल गुन्ह्यात सध्या जळगाव कारागृहात...
Read More