दहिसर येथे खदाणीत बुडून एकाचा मृत्यू – eNavakal
News अपघात आजच्या ठळक बातम्या मुंबई

दहिसर येथे खदाणीत बुडून एकाचा मृत्यू

मुंबई  – खदाणीत बुडाल्याने एका ५५ वर्षीय इसमाचा  मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी दहिसर येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते  आहे.
दहिसर पूर्व , येथील लोधू कम्पाउंडमधील शीतल बार जवळ खदाण आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या खदाणीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिसरातील अनेक मुले तेथे पोहण्यासाठी येतात. दुपारी सव्वातीनच्या सुमारास एक इसम या खदाणीत बुडाल्याचे तेथील लोकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. पोलीस, पालिकेच्या वार्ड कार्यालयातील कर्मचारी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मदतकार्य हाती घेऊन सदर इसमाला बाहेर काढून शताब्दी रुग्णालयात नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नारायण (५५) असे या घटनेत मरण पावलेल्या इसमाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा

मुंबई- घाटकोपरमध्ये विषारी रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा झाल्याची घटना घडली. या सर्वांना महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विषारी रासायनिक रंगाचा...
Read More
post-image
News अपघात मुंबई

गोरेगावमध्ये कारच्या धडकेत 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई – गोरेगाव येथे एका कारच्या धडकेने अरहान रमजान खान या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका चार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू

दिंडोरी – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मादी आणि एका नर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईच्या कळंब समुद्रात 5 जणांना जलसमाधी

वसई – वसई तालुक्याच्या कळंब समुद्रकिनारीवर होळी- रंगपंचमी साजरी करण्यासाठी आलेल्या पाच जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली. एकाचा मृतदेह...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बांदिवडेकरांची उमेदवारी वादाच्या भोवर्‍यात

रत्नागिरी – ररत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार्‍या नविनचंद्र बांदिवडेकर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी असलेल्या वैभव राऊतला...
Read More