दहावी-बारावीच्या शिक्षकांची निवडणुकीच्या कामातून सुटका – eNavakal
महाराष्ट्र शिक्षण

दहावी-बारावीच्या शिक्षकांची निवडणुकीच्या कामातून सुटका

मुंबई – दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी नियामक आणि परीक्षक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांची निवडणुकांच्या कामामधून सुटका करावी या मागणीला आज अखेर यश आले आहे. मागील तीन दिवसांपासून विविध शिक्षक संघटना राज्यातील दहावी आणि बारावी बोर्डाचे काम असणार्‍या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे यासाठी मागणी करत होते.

निवडणूक आयोगाचे उपसचिव आणि सह मुख्य निवडणूक अधिकारी ए.एन वळवी यांनी परिपत्रक काढून सर्व जिल्हाधिकारी यांना आदेश दिले आहेत. परीक्षेसाठी नियामक आणि परीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकांना कामातून वगळावे, असे आदेश निवडणूक आयोगाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

दहावी-बारावीचे परीक्षा सध्या सुरु आहे. शिवाय परीक्षा झाल्यावर पेपर तपासण्याचे काम शिक्षकांना असते. सुमारे 50 हजाराच्या वर शिक्षकांना निवडणुकीचे काम दिले जाणार होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे आणि विविध शिक्षक संघटनांनी दहावी आणि बारावीचे पेपर तपासणी आणि निकालासंदर्भातील काम असल्याने निवडणुकीची ड्यूटी देऊ नये, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. शिक्षक भारतीने अतिरिक्त शिक्षकांना निवडणुकीचे काम द्यावे आणि इतर शिक्षकांना शाळेच्या परीक्षाचे काम करू द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र या मागणीबाबत अद्याप विचार झाला नसल्याचे निवडणूक आयोकडून सांगण्यात आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More