दहावीत नापास झाल्याने परभणीत विद्यार्थिनीची आत्महत्या – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र शिक्षण

दहावीत नापास झाल्याने परभणीत विद्यार्थिनीची आत्महत्या

परभणी – यंदा एसएससी बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल अत्यंत धक्कादायक असा लागला. या परीक्षेत राज्यातील चार लाख विद्यार्थी नापास झाले. त्यामुळे दहावीचा टक्का जवळपास १२.३१ टक्क्यांनी घसरला. यंदा अभ्यासक्रम बदलल्याने निकाल कमी लागल्याचे म्हटले जात आहे. मात्र यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या हाती निराशा आली. परभणीत अशाच दहावीत नापास झालेल्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. परभणीतील सेलू तालुक्यात चिखलठाणा येथे ही घटना घडली असून या विद्यार्थिनीने विष पिऊन आपले जीवन संपवले. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दहावीत नापास झाल्याने आत्महत्या केल्याचे तिच्या नातेवाईकांनी म्हटले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज अखेर दिवाळखोरीत

नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेज कंपनी अखेर दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्याबाबत एकाही...
Read More