दहशतवाद्यांना धर्म नसतो – eNavakal
लेख

दहशतवाद्यांना धर्म नसतो

रमझानच्या काळात काश्मिर खोर्‍यात लष्कराने दहशतवाद्यांविरुध्दची कारवाई थांबवावी ही मुख्यमंत्र मेहबूबा मुफ्ती यांची विनंती केंद्राने सशर्त मान्य केली. याचा अर्थ रमझानसारखा सण हा शांततेची ग्वाही देतो. पण धर्माच्या नावाखाली दहशतवादी अशांतता निर्माण करतात. याला या विनंतीने एकाअर्थी दुजोरा दिला आहे. ईस्लाममधील अनेक तत्वे ही शांतता आणि मानवता शिकवणारी आहेत. दुर्दैवाने त्याचे गैरअर्थ काढले गेल्यामुळे धर्माच्या नावाखाली काही धर्मांधांकडून दहशत माजवली जाते. मुस्लिमांसाठी रमझान हा अतिशय पवित्र महिना मानला जातो. तो शांततेत साजरा करता यावा या हेतूने त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केलेली आहे. खरे तर दहशतवाद्यांना धर्म नसतो. कारण त्यांची प्रत्येक कृती ही मानवतेविरुध्द असते. प्रत्येक धर्मामध्ये मानवतेचे संरक्षण सांगून त्याचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न केला गेला आहे. परंतु ज्या लोकांकडून मानवतेच्याच चिंधड्या उडवल्या जातात. त्यांना दहशतवादीच म्हणावे लागते. आणि म्हणूनच ा काळात लष्कराने दहशतवाद्यांविरुध्दची कारवाई थांबवावी ही मागणी एवढी तर्काधिष्ठित किंवा न्यायोचितही वाटत नाही. कारण काश्मिर खोर्‍यामध्ये शांतता निर्माण व्हावी. सामान्य माणसाला आपले दैनंदिन जीवन सुखरूप जगता यावे. त्यासाठी लष्कर सातत्याने प्रयत्न करीत आहे. मात्र तिथल्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन आणि पाकिस्तानच्या पैशावर आपले पोट भरणार्‍या फुटीरतावाद्यांनी त्याठिकाणी सतत अस्थिरता कायम ठेवली. निष्पाप नागरिकांचे बळी घेण्याचा आणि अशा निष्पापांना संरक्षण देणार्‍या लष्करावरही हल्ला करण्याचा भेकड प्रकार ते करीत राहिले आहेत. लष्कर निर्माण करू पाहात असलेली शांतताच ज्यांना मान्य नाही. ते रमझानच्या पवित्र महिन्यात तरी शांतता कायम ठेवतील यावर विश्वास तरी कसा ठेवायचा असा प्रश्न निर्माण होतो. लष्कराच्या कारवाईदरम्यान सामान्य नागरिकावर काही प्रमाणात ताण येतो ही गोष्ट खरी आहे. परंतु त्याचा लाभ किंवा फायदा हा तिथल्या नागरिकांनाच होणार असतो. बर्‍याचवेळेला तर तिथल्या या सामान्य नागरीकाची दिशाभूल करून दहशतवादी स्वतःची आश्रयस्थाने निर्माण करतात. ते अशा ठिकाणी लपून बसतात की तिथे जाऊन लष्कराला कारवाई करण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशी परिस्थिती असतानाही केंद्राने व्यापक हित लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांची विनंती मान्य केली आहे. मात्र या काळात जर दहशतवाद्यांकडून कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला तर तो परतवून लावण्याचा किंवा एखादी निश्चित स्वरुपाची गुप्तचरांची माहिती प्राप्त झाली तर त्यानुसार कारवाई करण्याचा अधिकार केंद्राने राखून ठेवलेला आहे. प्रश्न एवढाच आहे की रमझानचे पावित्र्य हे जर माणूसकीच्या चारित्र्याशी निगडीत असेल तर हे दहशतवादी निदान या काळात तरी समजूतदारपणा दाखवातात का हे पाहायला हवे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

लातूरात वाळू तस्करांवर 13 लाखांची दंडात्मक कारवाई

लातूर- मांजरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करावर लातूर तहसीलदारांनी कारवाई केली. यामध्ये नऊ वाहने जप्त करीत तब्बल 13 लाखांचा दंड वसूल करण्यात...
Read More
post-image
News देश

तुंगनाथ तीर्थक्षेत्र लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार

रुद्रप्रयाग – रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तृतीय केदार तुंगनाथ तीर्थक्षेत्रही लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो पर्यटक येतात. यासोबतच क्रौंच पर्वतावरील कार्तिक स्वामींचे मंदिरदेखील झळाळणार...
Read More
post-image
News देश

नवी दिल्ली-चंदिगढ रेल्वे प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आणि पंजाब-हरियाणा राज्यांची राजधानी चंदिगढ यांच्यामधील प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार आहे. या प्रवासाचा फक्त वेळच कमी...
Read More
post-image
News देश

राफेल विमान खरेदी! राहुल गांधी आज करणार नेत्यांशी चर्चा

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चालू असलेले राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन भाजपाला घेरण्यासाठी आज राहुल गांधी या विषयासंदर्भात...
Read More
post-image
क्रीडा

भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार – श्रीजेश

जकार्ता – आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले. स्पर्धेपूर्वी आज...
Read More