दहशतवादी घुसखोरी रोखण्यासाठी भारताची नामी शक्कल – eNavakal
आघाडीच्या बातम्या दहशतवाद देश

दहशतवादी घुसखोरी रोखण्यासाठी भारताची नामी शक्कल

नवी दिल्ली – दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी भारताने एक नामी शक्कल लढवली आहे. जम्मू सीमेवर इलेक्ट्रॉनिक भिंत उभारण्यात आली आहे. जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर हायटेक सर्व्हीलन्स सिस्टिम लावली आहे. यामुळे जमिनीवर, पाण्यात आणि हवेत अदृश्य इलेक्ट्रॉनिक बॅरियर बसवला आहे. आजपर्यंत सीमेवर असा प्रयोग झालेला नाही. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे सोमवारी प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत.

भारताच्या सीमा सुरक्षा दलाला यामुळे मोठी मदत होणार आहे. याशिवाय जम्मूतील ५.५ किलोमीटरपर्यंत दलाचे लक्ष राहू शकते असा प्रकल्प देखील सुरु करण्यात आला आहे. याला कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्टीग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टिम असे म्हटले जाते. रात्रीच्या वेळी पाकिस्तानातून काही दहशतवादी घुसतात. या प्रणालीद्वारे मात्र त्यांनी भुयार जरी खोदले तरी ते पकडले जाणार आहेत. या सिस्टीम मधील थर्मल इमेजर, इन्फ्रारेड आणि लेझर बेस्ड इन्ट्रुडर अलार्ममुळे हे शक्य होणार आहे.

 

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

लक्ष्मीनगर परिसरात अपघात! दोन जणांचा मृत्यू

मुंबई-  घाटकोपर – अंधेरी लिंक रोडवर लक्ष्मीनगर परिसरात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर संतप्त नागरिकांनी रस्ता रोको सुरू...
Read More
post-image
News मुंबई

रस्ते, फूटपाथ खड्डेमुक्त केले जातील महापालिकेचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र

मुंबई -शहरातील रस्ते, फूटपाथ खड्डे बुजविण्यास मेटा कुटीला आलेल्या मुंबई महापालिकेने पावसाळ्यात खड्डे बुजविण्याबरोबर त्या खड्ड्यांचा सामना करण्यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे. पावसाळ्यापूर्वी आणि...
Read More
post-image
देश

दुरान्तो एक्स्प्रेसवर दरोडा; चोरटे एसी डब्यात घुसले

दिल्ली- रेल्वे मार्गावरचे सिग्नल फेल करून जम्मू-दिल्ली दुरान्तो एक्स्प्रेसचे दोन डबे लुटल्याची घटना आज पहाटे साडेतीनच्या सुमारास बादली-सराय रोहिल्ला स्टेशनदरम्यान घडली आहे. पहाटे तीनच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात

नवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...
Read More